शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रादिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
2
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
5
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
6
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
7
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
8
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
9
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
10
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
11
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
12
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
13
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
14
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
15
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
16
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
17
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
18
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
19
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
20
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेत १२ देशांमधील नागरिकांना 'नो एन्ट्री'; आणखी सात देशांवरही लादणार अंशतः प्रवेशबंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 13:20 IST

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय

वॉशिंग्टन:  राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणिस्तान, म्यानमार, चाड, काँगो प्रजासत्ताक, इक्वेटोरियल गिनी, एरिट्रिया, हैती, इराण, लिबिया, सोमालिया, सुदान, येमेन या बारा देशांतील नागरिकांच्या अमेरिका प्रवेशावर संपूर्ण बंदी घातली, तर बुरुंडी, क्यूबा, लाओस, सिएरा लिओन, टोगो, तुर्कमेनिस्तान, व्हेनेझुएला या सात देशांतील नागरिकांवर अंशत: प्रवेशबंदी घातली आहे. हा आदेश येत्या सोमवारी, ९ जूनपासून लागू होणार आहे.

सुरक्षेला असलेला धोका आणि व्हिसा कालावधी संपूनही लोक बेकायदेशीर वास्तव्य करत असल्याने उद्भवलेल्या समस्यांमुळे हा निर्णय घेतल्याचे ट्रम्प यांनी म्हटले. त्यांनी २०१७ सालीही काही देशांतील नागरिकांना प्रतिबंध केला होता. त्याचाच पुढील टप्पा म्हणून हा आदेश जारी करण्यात आला. अमेरिकेत होणाऱ्या दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी ट्रम्प यांनी काही देशातील नागरिकांवर निर्बंध लागू केले होते. (वृत्तसंस्था)

या कारणांसाठी केली अमेरिकेत प्रवेशबंदी

अफगाणिस्तान हा तालिबानच्या नियंत्रणाखालील देश असून, तिथे ओळखपत्र प्रणालीचा अभाव आहे. येथील लोकांनी व्हिसाची मुदत संपल्यावरही बेकायदेशीर वास्तव्य केले. म्यानमारमधून अमेरिकेत पर्यटक म्हणून आलेल्यांपैकी २७ टक्के, विद्यार्थ्यांपैकी ४२ टक्के लोकांनी व्हिसा संपल्यावरही बेकायदेशीर वास्तव्य केले. असेच वर्तन चाड, काँगो प्रजासत्ताक, इक्वेटोरियल गिनी, एरिट्रिया, हैती, इराण, लिबिया, सोमालिया, सुदान, येमेन या देशांतील नागरिकांनी अमेरिकेत केले आहे.

हार्वर्ड विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांना बंदी घालणार

हार्वर्ड विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या सर्व परदेशी विद्यार्थ्यांना अमेरिकेत येण्यास बंदी घालण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी  हालचाल सुरू केली आहे. या विद्यापीठातील एक चतुर्थांश विद्यार्थी विदेशी आहेत. तेथील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा प्रवाह रोखण्याचा अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचा प्रयत्न आहे. परदेशी नागरिकांना प्रवेश नाकारण्याचे अधिकार राष्ट्राध्यक्षांना आहेत. 

हार्वर्डमधील ८०० भारतीय विद्यार्थीही मोठ्या संकटात

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने हार्वर्ड विद्यापीठात परदेशी विद्यार्थी असूच नयेत अशा दृष्टीने हालचाली सुरू केल्याने तिथे असलेल्या ८०० भारतीय विद्यार्थ्यांसहित ६८०० परदेशी विद्यार्थी चिंताग्रस्त झाले आहेत. विद्यार्थी देवाणघेवाण उपक्रमांतर्गत हार्वर्ड विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या अन्य देशांतील विद्यार्थ्यांना आता ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. हार्वर्ड नवीन परदेशी विद्यार्थ्यांना यापुढे प्रवेश देऊ शकणार नाही, अशा पद्धतीने ट्रम्प यांनी निर्णय घेतले आहेत.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका