"हा चुकीचा निर्णय..."; इराणमधील ३० तेल डेपोंवर इस्रायलचा भीषण हल्ला, अमेरिका नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 12:24 IST2026-03-09T12:22:42+5:302026-03-09T12:24:35+5:30

इस्रायलने शनिवारी एकाच दिवसात इराणच्या ३० इंधन डेपोंवर एकापाठोपाठ एक भीषण हल्ले केले.

not good idea us reacts after israel pounds 30 iranian fuel depots in day article | "हा चुकीचा निर्णय..."; इराणमधील ३० तेल डेपोंवर इस्रायलचा भीषण हल्ला, अमेरिका नाराज

"हा चुकीचा निर्णय..."; इराणमधील ३० तेल डेपोंवर इस्रायलचा भीषण हल्ला, अमेरिका नाराज

इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या आठव्या दिवशी पहिल्यांदाच अमेरिका आणि इस्रायल यांच्यात गंभीर मतभेद समोर आले आहेत. इस्रायलने शनिवारी एकाच दिवसात इराणच्या ३० इंधन डेपोंवर एकापाठोपाठ एक भीषण हल्ले केले. अमेरिकेच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हे हल्ले इतके व्यापक असतील याची त्यांना कल्पना नव्हती. अमेरिकेने याला 'चुकीचा निर्णय' असं म्हटलं आहे.

एक्सिओस (Axios) च्या रिपोर्टनुसार, इस्रायली सैन्याने इंधन डेपोंवर हल्ला करण्यापूर्वी अमेरिकेला सूचना दिली होती, मात्र हल्ल्याची व्याप्ती अपेक्षेपेक्षा कितीतरी मोठी होती. अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, हल्ल्याचा परिणाम इतक्या मोठ्या प्रमाणावर होईल हे पाहून त्यांना धक्का बसला आहे. एका इस्रायली अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, वॉशिंग्टनचा मेसेज अत्यंत कठोर होता, ज्याचं वर्णन त्यांनी 'WTF' असं केलं.

"राष्ट्राध्यक्षांना हा हल्ला आवडलेला नाही"

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका सल्लागाराने सांगितलं की, "राष्ट्राध्यक्षांना हा हल्ला आवडलेला नाही. त्यांना तेल वाचवायचं आहे, जाळायचं नाही. अशा दृश्यांमुळे लोकांना वाढती महागाई आणि पेट्रोलच्या किमतींची आठवण होते." इस्रायली सैन्याने (IDF) आपल्या भूमिकेचं समर्थन करताना म्हटलं की, या डेपोचा वापर इराणी सैन्याला इंधन पुरवठा करण्यासाठी केला जात होता. इस्रायलच्या मते हा हल्ला इराणसाठी एक संकेत आहे की त्यांनी इस्रायलच्या नागरी पायाभूत सुविधांना टार्गेट करणं थांबवावं.

तेहरानमध्ये 'काळा पाऊस'

इस्रायली हवाई हल्ल्यानंतर तेहरानमध्ये एक भीतीदायक दृश्य पाहायला मिळालं. तेल डेपोला लागलेल्या भीषण आगीतून निघालेले धुराचे कण ढगांमध्ये मिसळले. जेव्हा तेहरानमध्ये पाऊस झाला, तेव्हा तो 'काळ्या पावसाच्या' स्वरूपात पडला. या विषारी पावसामुळे रस्ते, गाड्या आणि घरांचं छत काळं झालं असून आरोग्य आणि पर्यावरणाचं मोठं संकट उभं राहिलं आहे.

Web Title : ईरान के तेल डिपो पर इजरायल के हमले से अमेरिका नाराज़।

Web Summary : ईरान के तेल डिपो पर इजरायल के व्यापक हमले से अमेरिका नाराज़। अमेरिका ने इस कदम की आलोचना की है, उसे बढ़ती महंगाई और ईंधन की कीमतों की चिंता है। हमले के बाद तेहरान में 'काला पानी' बरसा, जिससे स्वास्थ्य और पर्यावरण को खतरा है।

Web Title : Israel's strike on Iran oil depots draws US ire.

Web Summary : US-Israel tensions rise as Israel's extensive attack on Iranian oil depots surprises Washington. The US criticizes the move, concerned about rising inflation and fuel prices. Tehran experiences 'black rain' after the attack, creating health and environmental hazards.