भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 15:46 IST2025-05-15T15:26:42+5:302025-05-15T15:46:13+5:30
आंतरराष्ट्रीय स्तरावर लाजिरवाणे होऊ नये म्हणून पाकिस्तान या १३ सैनिकांच्या मृत्यूची कबुली टप्प्याटप्प्याने देत आहे.

भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव सुरू आहे. या दरम्यान, दोन्ही देशामधील सीमेवर गोळीबार झाला. यामध्ये पाकिस्तानी लष्कराचे नुकसान झाले. पाकिस्तानने ११ सैनिकांच्या मृत्यूची कबुली दिली, आता अलीकडेच आणखी दोन सैनिकांच्या मृत्यूची माहिती समोर आली. यामुळे एकूण संख्या १३ झाली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर लाजिरवाणे होऊ नये म्हणून पाकिस्तान या १३ सैनिकांच्या मृत्यूची कबुली टप्प्याटप्प्याने देत आहे.
७ मे रोजी भारताने पाकिस्तानमधील ९ ठिकाणी हल्ला केला. यावेळी भारताने या हल्ल्यात १०० हून अधिक पाकिस्तानी दहशतवादी मारल्याचा दावा केला आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तानने एक निवेदन जारी करून म्हटले की फक्त त्यांचे नागरिकच मारले गेल्याचे म्हटले.
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
या हल्ल्यात कोणताही दहशतवादी किंवा त्यांचा सैनिक मारला गेला नाही, असे पाकिस्तानने म्हटले आहे. मसूद अझहरने एक निवेदन जारी करून पाकिस्तान सरकारचा पर्दाफाश केला.
युद्धविरामनंतर पाकिस्तानने जारी केलेल्या प्रसिद्ध केलेल्या निवेदनात ११ सैनिकांच्या मृत्युची कबुली देण्यात आली. पाकिस्तानी लष्कराच्या माहितीनुसार, या हल्ल्यात त्यांचे ११ सैनिक ठार झाले, तर ४० नागरिकांचाही मृत्यू झाला.
या हल्ल्यात १९९ लोक जखमी झाल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. लष्कराच्या या घोषणेनंतर, पाकिस्तान सरकारने सर्व मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १ कोटी रुपये देण्याची घोषणा केली. सैनिकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ कोटी रुपये देण्याची घोषणा करण्यात आली.
आणखी २ सैनिकांची नावे वाढवली
आता ४ दिवसांनंतर, पाकिस्तानने आता आणखी २ सैनिकांच्या मृत्यूची कबुली दिली आहे. दोन्ही सैनिक जखमी झाले होते त्यांचा आता मृ्तयू झाल्याचा दावा पाकिस्तानने केला. हवाई दलाच्या तंत्रज्ञ मोहम्मद अयाज यांच्या मृत्यूची चर्चा गेल्या ५ दिवसांपासून पाकिस्तानमध्ये सुरू होती, त्यांच्या नावाची आज घोषणा झाली.