शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
2
सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
3
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
4
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
5
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
6
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
7
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
8
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
9
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
10
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
11
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
14
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
15
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
16
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
17
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
18
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

उत्तर कोरियाचे नवीन ICBM मिसाइल शक्तीशाली आणि घातक - अमेरिकी विश्लेषक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2017 3:17 PM

उत्तर कोरियाने वॉसाँग-15 या आपल्या नव्या आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या चाचणीचे डझनभर फोटो प्रसिद्ध केले आहेत.

ठळक मुद्देतज्ञांच्या म्हणण्यानुसार वॉसाँग-15 हे यापूर्वीच्या क्षेपणास्त्राच्या तुलनेत आकाराने मोठे आणि टेक्नोलॉजीमध्ये अधिक सरस आहे. उत्तर कोरियाने जुलै महिन्यात दोनवेळा वॉसाँग-14 ची चाचणी केली होती.

टोक्यो - उत्तर कोरियाने वॉसाँग-15 या आपल्या नव्या आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या चाचणीचे डझनभर फोटो प्रसिद्ध केले आहेत. अमेरिकेच्या कुठल्याही शहरावर हल्ला करण्यास हे क्षेपणास्त्र सक्षम असल्याचा दावाही उत्तर कोरियाने केला आहे. उत्तर कोरियातील सत्ताधारी पक्षाच्या वर्तमानपत्रात हे फोटो प्रसिद्ध करण्यात आले आहेत. फोटो प्रसिद्ध होताच अमेरिकेसह उत्तर कोरियाच्या विरोधात असणा-या देशांच्या शास्त्रज्ञांनी हे क्षेपणास्त्र किती घातक ठरु शकते त्याचा अभ्यास करण्यास सुरुवात केली आहे. 

तज्ञांच्या म्हणण्यानुसार वॉसाँग-15 हे यापूर्वीच्या क्षेपणास्त्राच्या तुलनेत आकाराने मोठे आणि टेक्नोलॉजीमध्ये अधिक सरस आहे. उत्तर कोरियाने ही चाचणी करताना आपल्याच देशात बनवलेल्या मोबाइल लाँचरचा उपयोग केला. शास्त्रज्ञांनी क्षेपणास्त्राच्या रेंजबद्दल मात्र शंका उपस्थित केली आहे. 

क्षेपणास्त्र वॉसाँग-15 हे ICBM क्षेपणास्त्र वॉसाँग-14 पेक्षा आकाराने मोठे आहे. उत्तर कोरियाने जुलै महिन्यात दोनवेळा वॉसाँग-14 ची चाचणी केली होती. क्षेपणास्त्र चाचणीचे ऑनलाइन फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर कॅलफोर्नियातील सेंटर फॉर नॉनप्रॉलिफिरेशन स्टडीजचे संशोधक मायकल डटसमॅन म्हणाले कि, आकाराने हे क्षेपणास्त्र खूप मोठे दिसते. फक्त काही देशच असे क्षेपणास्त्र बनवू शकतात आणि आता उत्तर कोरिया या देशांच्या क्लबमध्ये दाखल झाला आहे. 

लाँचर वॉसाँग-15 देशातच बनवलेल्या इरेक्टर लाँचर वेईकलवरुन डागल्याचा दावा उत्तर कोरियाने केला होता. उत्तर कोरियाने जारी केलेल्या फोटोंवरुन त्यांनी लाँचर वेईकल बनवल्याचे स्पष्ट होते. मोबाइल लाँचर वेईकल विकसित केल्यामुळे उत्तर कोरियाला आता चीनवर अवलंबून राहण्याची गरज नाही. क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या बाबतीत त्यांनी गाठलेला हा मोठा टप्पा आहे. 

पेलोड वॉसाँग-15 मधून अमेरिकेच्या कुठल्याही भागात आपण अण्वस्त्र हल्ला करु शकतो असा दावा उत्तर कोरियाने केला आहे. फोटोवरुन या क्षेपणास्त्राचे आकारमानही खूप मोठे असल्याचे दिसत आहे. क्षेपणास्त्रामध्ये वजन जितके जास्त असते त्याची रेंज तितकीच कमी होते. प्रसिद्ध क्षेपणास्त्र अभ्यासक मायकल अलमॅन म्हणाले कि, वॉसाँग-15 अमेरिकेपर्यंत तेव्हाच पोहोचू शकेल जेव्हा त्यातील अणूबॉम्बचे वजन 350 किलोग्रॅमपेक्षा कमी असले. 600 किलोग्रॅम पेलोडसह हे क्षेपणास्त्र अमेरिकेपर्यंत पोहोचणे कठिण आहे.  

Get Latest Marathi News, Mumbai News, Pune News, Maharashtra News Here on Lokmat.com

टॅग्स :north koreaउत्तर कोरियाAmericaअमेरिका