शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
4
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
5
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
6
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
7
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
8
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
9
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
10
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
11
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
12
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
13
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
14
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
15
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
16
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
17
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
18
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
19
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
20
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

...तर उत्तर कोरियाचा बंदोबस्त करणार !

By admin | Updated: April 4, 2017 05:15 IST

चीनने उत्तर कोरियाच्या अणुकार्यक्रमाला लगाम न घातल्यास अमेरिका एकटाच त्याचा बंदोबस्त करण्यास तयार आहे

पोटोमॅक फॉल्स (अमेरिका) : चीनने उत्तर कोरियाच्या अणुकार्यक्रमाला लगाम न घातल्यास अमेरिका एकटाच त्याचा बंदोबस्त करण्यास तयार आहे, असे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या आगामी अमेरिका दौऱ्यात आपण हा मुद्दा उपस्थित करू, असेही ते म्हणाले. ट्रम्प यांनी फायनान्शियल एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, ‘होय, आम्ही उत्तर कोरियाबाबत बोलणार आहोत. उत्तर कोरियावर चीनचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे या मुद्यावर चीन आमची किती मदत करतो हे पाहावे लागेल. त्याने जर मदत केली नाही, तर अमेरिका स्वत:च हा मुद्दा सोडवेल, असे ट्रम्प म्हणाले. साऊथ फ्लोरिडा येथील मार- ए- लेगो इस्टेटमध्ये चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या सोबत होणाऱ्या बैठकीच्या काही दिवस आधी ट्रम्प यांनी वरील टिपणी केली. या बैठकीत उभय नेत्यांत उत्तर कोरियाशिवाय व्यापार आणि दक्षिण चीन सागराबाबतच्या प्रादेशिक वादावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. अमेरिका चीनच्या मदतीशिवाय उत्तर कोरियातील परिस्थिती हाताळू शकतो, असेही त्यांनी सांगितले. तुम्ही उत्तर कोरियात परिस्थिती कशी हाताळाल, असा प्रश्न विचारला असता ते मी तुम्हाला सांगणार नाही. तुम्हाला हे ठाऊक आहे मी गतकाळातील अमेरिका नाही. यापूर्वी आम्ही पश्चिम आशियात काय करणार हे सांगितले जात असे; पण आता तसे होणार नाही, असे ट्रम्प म्हणाले. (वृत्तसंस्था)>अनेकदा तक्रार... पण फरक नाहीदक्षिण कोरिया, अमेरिका आणि जपानसारख्या देशांनी संयुक्त राष्ट्रसंघाकडे याची अनेकदा तक्रार केली आहे. यावर्षी उत्तर कोरियाने पाच अण्वस्त्र आणि एका क्षेपणास्त्र मालिकेची चाचणी सुरू केली.ओबामा यांच्यानंतर ट्रम्प प्रशासनातही उत्तर कोरियाने शस्त्र विस्तार कार्यक्रम बंद केला नाही. गेल्यावर्षी जानेवारीत त्याने हायड्रोजन बॉम्बची चाचणी घेतली होती. ट्रम्प यांनी इशारा दिल्यानंतरही उत्तर कोरिया शस्त्र विस्तार कार्यक्रम सोडण्यास तयार नाही.