शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

ब्रुनको, रॅम्सडेल व साकागुची यांना मेडिसिनचे नोबेल; टी-पेशींचा शोध, कर्करोग आणि मधुमेहावर उपयुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 06:32 IST

शरीराच्या प्रतिकारशक्तीची दिशा योग्य ठेवणाऱ्या ‘पेरिफेरल इम्युन टॉलरन्स’ या यंत्रणेशी संबंधित त्यांच्या संशोधनाला हा सर्वोच्च सन्मान मिळाला आहे.  स्टॉकहोम येथील कारोलिन्स्का इन्स्टिट्यूटच्या समितीकडून ही घोषणा करण्यात आली. 

स्टॉकहोम : यंदाचा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार अमेरिकेच्या मेरी ई. ब्रुनको, फ्रेड रॅम्सडेल आणि जपानच्या शिमॉन साकागुची या तीन शास्त्रज्ञांना जाहीर करण्यात आला आहे. शरीराच्या प्रतिकारशक्तीची दिशा योग्य ठेवणाऱ्या ‘पेरिफेरल इम्युन टॉलरन्स’ या यंत्रणेशी संबंधित त्यांच्या संशोधनाला हा सर्वोच्च सन्मान मिळाला आहे.  स्टॉकहोम येथील कारोलिन्स्का इन्स्टिट्यूटच्या समितीकडून ही घोषणा करण्यात आली. 

कोणत्या संशोधनासाठी पुरस्कार

शरीरातील प्रतिकारक शक्ती आपल्याच ऊतींवर किंवा अवयवांवर चुकून हल्ला करू नये, यासाठी कशा प्रकारे नियंत्रण ठेवले जाते, याचा शोध या शास्त्रज्ञांनी घेतला. त्यांनी प्रतिकारशक्तीतील ‘रेग्युलेटरी टी-सेल्स’ या पेशींची भूमिका स्पष्ट केली. या पेशी इतर इम्यून सेल्सवर लक्ष ठेवतात व शरीराच्या स्वतःच्या ऊतींचे संरक्षण करतात. 

‘पेरिफेरल इम्युन टॉलरन्स’ म्हणजे काय? 

ही अशी यंत्रणा आहे, जी शरीरातील प्रतिकारशक्तीला  स्वतःच्या ऊतींवर हल्ला करण्यापासून थांबवते. ती फक्त बाह्य आक्रमण कर्त्यांविरुद्ध लढेल, याची खात्री देते.

 ‘’संशोधनामुळे वैद्यकीय शास्त्राला नवी दिशा मिळाली असून, कॅन्सर उपचार व अवयव प्रत्यारोपण अधिक प्रभावी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे,’’ असे नोबेल समितीने म्हटले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Nobel Prize in Medicine awarded for T-cell discovery, aiding cancer, diabetes.

Web Summary : Brunko, Ramsdell, and Sakaguchi win the Nobel for discovering regulatory T-cells. Their work clarifies how the body prevents immune attacks on itself, opening new avenues for treating cancer and diabetes.
टॅग्स :Nobel Prizeनोबेल पुरस्कार