आता चहा-बिस्किटासाठीही पैसे नाहीत; पाकिस्तान सरकारवर काय वेळ आलीय बघा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2019 11:09 AM2019-08-26T11:09:29+5:302019-08-26T11:11:32+5:30

भारताने जम्मू-  काश्मीरमधील कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तानने भारतासोबतचे व्यापारी संबंध तोडले होते.

No money for tea-biscuits anymore; What time is it on the government of Pakistan | आता चहा-बिस्किटासाठीही पैसे नाहीत; पाकिस्तान सरकारवर काय वेळ आलीय बघा!

आता चहा-बिस्किटासाठीही पैसे नाहीत; पाकिस्तान सरकारवर काय वेळ आलीय बघा!

Next

नवी दिल्ली:  भारताने जम्मू-  काश्मीरमधील कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तानने भारतासोबतचे व्यापारी संबंध तोडले होते. त्यानंतर पाकिस्तानची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस इतकी वाईट झाली की त्यांना आता चहापानासाठी लागणारे पैसे देखील भरण्यासाठी परवडत नसल्याचे वृत्त समोर आले आहे. 

पाकिस्तानी वृत्तपत्रानुसार पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानची आर्थिक स्थिती अतिशय बिकट झाल्याने चहापानावर होणारा खर्च देखील न परवडणारा झाला आहे. त्यामुळेच सरकारने बैठकी दरम्यान दिला जाणारा चहा- बिस्किटावर बंदी घालण्याची नामुष्की पाकिस्तानवर ओढावली आहे. आहे. या निर्णयामुळे ज्या अधिकाऱ्यांना मधुमेहसारखा आजार आहे त्यांना तासंतास चालणाऱ्या बैठकीत काहीही न खाता बसणं कठीण असल्याचे देखील पाकिस्तानी वृत्तपत्राने म्हणटले आहे. 

भारताने जम्मू आणि काश्मीरमधील कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तान सैरभैर झाला आहे. त्यामुळेच, इम्रान खान यांनीही भारतासोबतचे व्यापारी संबंध तोडले असून युद्धाची धमकीही भारताला दिली होती. याचा परिणाम पाकिस्तानमधील अर्थव्यवस्थेवर झाला असून तेथे महागाई वाढली आहे. तेथे सोन्याचे दर एक प्रति तोळा 87 हजार रुपयांवर पोहचले आहेत. तर, टोमॅटोची किंमत तब्बल 300 रुपये प्रतिकिलो एवढी झाली आहे. 

पाकिस्तानच्या वित्त आयोगानूसार 2018- 19च्या दरम्यान कर्जाचा बोजा वाढविल्याने त्यांच्या कर्जात  2.29 अब्ज डॉलरने वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे गेल्या तीन वर्षात पाकिस्तानचे कर्ज अनुक्रमे 6.82 अब्ज डॅालर,  4.77 अब्ज डॉलर आणि 6.64 अब्ज डॉलर इतकं आहे.
 

Web Title: No money for tea-biscuits anymore; What time is it on the government of Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.