Donald Trump : Video - डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात ‘No Kings’ रॅली; ९० लाख लोक उतरले रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 13:11 IST2026-03-29T13:10:32+5:302026-03-29T13:11:57+5:30

Donald Trump : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्ध जनतेमध्ये संतापाची लाट पाहायला मिळत आहे.

no kings protest donald trump iran war immigration policy rallies usa europe crowd response | Donald Trump : Video - डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात ‘No Kings’ रॅली; ९० लाख लोक उतरले रस्त्यावर

Donald Trump : Video - डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात ‘No Kings’ रॅली; ९० लाख लोक उतरले रस्त्यावर

अमेरिकेतील लोकांचा राग आता अनावर झाला आहे. एकीकडे पश्चिम आशियात इराणविरुद्ध युद्ध सुरू आहे, ज्यामध्ये हजारो लोकांचा बळी गेला आहे, तर दुसरीकडे देशांतर्गत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्ध जनतेमध्ये संतापाची लाट पाहायला मिळत आहे. अमेरिकेतील सर्व ५० राज्यांमध्ये "नो किंग्स" (No Kings - कोणताही राजा नको) या बॅनरखाली हजारो रॅली काढण्यात आल्या. या आंदोलनाचे पडसाद केवळ अमेरिकेतच नव्हे, तर युरोप, लॅटिन अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्येही उमटले, जिथे लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले.

"नो किंग्स" आंदोलनाची ही तिसरी मोठी रॅली होती. आयोजकांच्या मते, जूनमध्ये ५० लाख आणि ऑक्टोबरमध्ये ७० लाख लोक सहभागी झाले होते. यावेळी हा आकडा ९० लाखांपर्यंत पोहोचल्याचा अंदाज आहे. संपूर्ण देशात ३,१०० पेक्षा जास्त कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते, जे ऑक्टोबरच्या तुलनेत ५०० ने जास्त होते. विशेष म्हणजे यातील दोन तृतीयांश रॅली मोठ्या शहरांच्या बाहेर म्हणजेच लहान शहरं आणि ग्रामीण भागात काढण्यात आल्या.

मिनेसोटा बनलं आंदोलनाचं केंद्र; स्प्रिंगस्टीन यांचं गाणं

यावेळची सर्वात मोठी रॅली मिनेसोटाची राजधानी सेंट पॉल येथे झाली, ज्याला राष्ट्रीय मुख्य कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. येथे प्रसिद्ध रॉक गायक ब्रूस स्प्रिंगस्टीन यांनी आपलं नवीन गाणं "स्ट्रीट्स ऑफ मिनियापोलिस" सादर केलं. हे गाणं त्यांनी रेनी गुड आणि एलेक्स प्रेटी यांच्या स्मृतीप्रत्यर्थ लिहिलं होतं, ज्यांचा अमेरिकन इमिग्रेशन एजंट्सच्या गोळीबारात मृत्यू झाला होता. स्प्रिंगस्टीन म्हणाले की, "मिनेसोटातील लोकांच्या शक्तीने संपूर्ण देशाला आशा दिली आहे. शहरांवरील हे हल्ले आता टिकणार नाहीत."

या आंदोलनात अभिनेते रॉबर्ट डी नीरो, गायिका जोन बेझ, अभिनेत्री जेन फोंडा आणि सिनेटर बर्नी सँडर्स यांच्यासह अनेक दिग्गज सहभागी झाले होते. कॅपिटलच्या पायऱ्यांवर एक मोठा बॅनर लावण्यात आला होता, ज्यावर लिहिलं होतं, "आमच्याकडे शिट्ट्या होत्या, त्यांच्याकडे बंदुका. क्रांती मिनियापोलिसमधून सुरू होते."

लोकांच्या नाराजीची कारणं

आंदोलकांमध्ये अनेक मुद्द्यांवरून तीव्र संताप होता. सर्वात मोठा मुद्दा ट्रम्प प्रशासनाचे आक्रमक इमिग्रेशन अभियान (ICE ची कारवाई) हा होता, ज्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. याशिवाय इराणविरुद्ध सुरू असलेले युद्ध, ट्रान्सजेंडर हक्कांमध्ये केलेली कपात आणि श्रीमंतांचा वाढता आर्थिक दबदबा यांविरुद्धही लोकांनी आवाज उठवला.

वॉशिंग्टनमध्ये शेकडो लोकांनी लिंकन मेमोरियलजवळ मोर्चा काढला, जिथे "राजमुकूट काढा, जोकर" असे बॅनर झळकले. सॅन डिएगोमध्ये सुमारे ४०,००० लोक रस्त्यावर उतरले. न्यूयॉर्क सिव्हिल लिबर्टीज युनियनच्या प्रमुख डोना लिबरमन म्हणाल्या की, "ट्रम्प यांना वाटतं की लोकांनी घाबरून घरात बसावं, पण तसं होणार नाही." हा विरोध केवळ अमेरिकेपुरता मर्यादित नव्हता. ज्या देशांमध्ये राजेशाही आहे, तिथे या आंदोलनाला "नो टायरंट्स" (No Tyrants - कोणताही हुकूमशहा नको) असं नाव देण्यात आलं.

Web Title : ट्रंप के खिलाफ अमेरिका और दुनिया में विशाल 'नो किंग्स' रैलियां

Web Summary : अमेरिका और विश्व स्तर पर 'नो किंग्स' रैलियों में लाखों लोगों ने ट्रंप की नीतियों का विरोध किया। आव्रजन नीतियों और विदेशी संघर्षों से शुरू हुए प्रदर्शनों में शहरों और ग्रामीण क्षेत्रों में भागीदारी देखी गई, मिनेसोटा में ब्रूस स्प्रिंगस्टीन की विशेषता वाली एक बड़ी रैली हुई।

Web Title : Massive 'No Kings' Rallies Against Trump Sweep Across America, Globe

Web Summary : Millions protested Trump's policies across the US and globally in 'No Kings' rallies. Triggered by immigration policies and foreign conflicts, demonstrations saw participation in cities and rural areas, with a large rally in Minnesota featuring Bruce Springsteen.