‘मला पकडून दाखवा, भेकडांनो उशीर करू नका…’, माडुरो अमेरिकेला देत होते अव्हान, तो व्हिडीओ समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 18:51 IST2026-01-04T18:50:52+5:302026-01-04T18:51:55+5:30
Nicolas Maduro Arrest News: शनिवार ३ जानेवारी रोजी जगाच्या इतिहासाातील सर्वात धक्कादायक कारवाई करत अमेरिकेने व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस माडुरो आणि त्यांच्या पत्नी सिलिया फ्लोर्स यांना पकडले होते. त्यानंतर त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

‘मला पकडून दाखवा, भेकडांनो उशीर करू नका…’, माडुरो अमेरिकेला देत होते अव्हान, तो व्हिडीओ समोर
शनिवार ३ जानेवारी रोजी जगाच्या इतिहासाातील सर्वात धक्कादायक कारवाई करत अमेरिकेने व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस माडुरो आणि त्यांच्या पत्नी सिलिया फ्लोर्स यांना पकडले. व्हेनेझुएलाच्या सैनिकी ठिकाणांवर तुफानी हवाई हल्ला केल्यानंतर अमेरिकी सैन्य दलाच्या तुकडीने व्हेनेझुएलाची राजधानी काराकस येथे धाडसी कारवाई करत माडुरो यांना ताब्यात घेतले. दरम्यान, हेच माडुरो काही काळापूर्वी अमेरिकेची भेकड अशी संभावना करत आपल्याला पकडून दाखवा असं आव्हान देतानाचा एक जुना व्हिडीओ समोर आला आहे.
व्हेनेझएलाचे राष्ट्रपती निकोलस माडुरो यांच्यावर कारवाई करून त्यांना ताब्यात घेल्यानंतर अमेरिकेला आव्हान देतानाचा त्यांचा एक जुना व्हिडीओ व्हाईट हाऊसने समोर आणला आहे. या व्हिडीओमध्ये निकोलस माडुरो हे मला येऊन पकडून दाखवा. ‘मी येथे मिराफ्लोरेस (व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतींच्या महालात) तुमची वाट पाहत आहे. भेकडांनो उशीर करू नका’, अशा शब्दात आव्हान देताना दिसत आहेत. दरम्यान, व्हाईट हाऊसने या व्हिडीओसोबत अमेरिकेने माडुरो यांच्याविरोधात राबवलेल्या अभियानाचे व्हिडीओसुद्धा शेअर केले आहेत. तसेच माडुरो यांना कशा पद्धतीने पकडण्यात आले, त्याची माहिती दिली आहे.
दरम्यान, अमेरिकन सैन्याने राबलेलल्या या अभियानाला अॅब्सोल्युट जस्टिस असं नाव देण्यात आलं होतं. निकोलस माडुरो यांच्यावर २०२० मध्ये अमेरिकेमध्ये ड्रग्स तस्करी आणि दहशतवादाचे आरोप केले होते. तसेच तेव्हापासून ते अमेरिकन सरकारच्या रडारवर होते. दरम्यान, शनिवारी माडुरो यांच्याविरोधात केलेल्या कारवाईची माहिती देत अमेरिकेने जगाला आश्चर्याचा धक्का दिला आहे.