शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
3
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
4
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
5
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
6
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
7
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
8
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
9
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
10
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
11
१.२५ कोटी दे अन् घटस्फोट घे, ७ महिन्याच्या लग्नानं पतीचे निघाले दिवाळे; सुप्रीम कोर्टाचे कठोर आदेश
12
“१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य, अन्यथा परवाने रद्द”: प्रताप सरनाईक
13
अमेरिका-इराण युद्धामुळे पेट्रोल-डिझेल महागणार? अमेरिकेनं सुरू केली नाकेबंदी; भारताला बसणार मोठा फटका?
14
Chanakya Niti: शत्रू समोरून वार करतो, पण मित्र पाठीमागून! धोका टाळण्यासाठी चाणक्य नीतीचे महत्त्वाचे नियम
15
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
16
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
17
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
18
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
19
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
Daily Top 2Weekly Top 5

नेपाळ भूकंपबळींची संख्या ७,७००

By admin | Updated: May 7, 2015 01:16 IST

विनाशकारी भूकंपानंतर उद्धवस्त झालेल्या नेपाळमध्ये आता जनजीवन पुन्हा रूळावर आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु करण्यात येत असून या भूकंपातील मृतांचा आकडा ७,७०० वर पोहोचला आहे.

काठमांडू : विनाशकारी भूकंपानंतर उद्धवस्त झालेल्या नेपाळमध्ये आता जनजीवन पुन्हा रूळावर आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु करण्यात येत असून या भूकंपातील मृतांचा आकडा ७,७०० वर पोहोचला आहे.दोन हजार अभियंत्याचा ताफा भूकंपग्रस्त भागातील कोणतीही घरे राहण्यासाठी लायक आहेत, हे तपासण्याकामी लागले असून आतापर्यंत त्यांनी १३ हजार घरांची तपासणी केली आहे. यापैैकी ५० टक्के घरांची अवस्था राहण्यालायक असून २० ते २५ टक्के घरे मात्र राहण्यालायक नाहीत, तर उर्वरित घरांचां जीर्णोद्धार करण्याची गरज आहे.२५ एप्रिल रोजी झालेल्या विनाशकारी भूकंपातील मृतांची संख्या ७,६५२ वर पोहोचली असून १६,३९० लोक जखमी झाल्याचे गृहमंत्रालयाने सांगितले. या भूकंपाचा सर्वाधिक तडाखा सिंधुपाल चौक जिल्ह्याला बसला. या जिल्ह्यात २,९३९ लोक मृत्यूमुखी पडले, तर काठमांडूत १,२०९ लोक मृत्यू पावले.नेपाळचे राष्ट्रपती भवनही राहण्यास योग्य नसल्याचे घोषित करण्यात आले आहे. ब्रिटीशकालीन या इमारतीला जागोजागी तडे गेले आहेत. शीतल निवास नावाने राष्ट्रपती भवन ओळखले जाते. या इमारतीचा मागचा भाग सुरक्षित नसल्याचे नागरी \विकास आणि गृहनिर्माण विभागाच्या तज्ज्ञांंनी घोषित केले आहे.नेपाळने विदेशी मदत पथकांना मायदेशी परतण्याचे आवाहन केल्याने भारतासह ३३ देशांचे मदत पथके परतीच्या मार्गावर आहेत. भारताच्या एनडीआरएफचे ८० जणांचे पथक नेपाळहून निघाले आहे. तसेच थायलँडचे २१ स्वयंसेवकही मायदेशी रवाना झाले आहेत. (वृत्तसंस्था)----------नेपाळी लष्कर आणि पोलिस भूकंपग्रस्त भागातील मदत कार्य हाती घेणार असून टप्प्याटप्प्यात विदेशी मदत पथके मायदेशी परततील, असे नेपाळच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.दरम्यान, बारापाक डोंगरी भागातील भूकंपग्रस्त लोकांपर्यंत अजुनही मदत पोहोचलेली नाही. तंबू आणि इतर आवश्यक वस्तुंसाठी त्यांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे. थंडी आणि पावसापासून बचाव करण्यासाठीही त्यांना सुरक्षित जागा नाही. लष्कराने हेलिकॉप्टरमधून मदत साहित्य पोहोचविले असले तरी ते पुरेसे नाही. मदत साहित्य अत्यंत कमी प्रमाणात येत आहे. बारापाक भागातील लोक आता आपापल्या गावाच्या मदतीसाठी परतत आहेत.ड्रोन विमानांना बंदीनेपाळने आपल्या हवाई हद्दीत ड्रोन विमानांना बंदी घातली आहे. मानवरहित विमानांमुळे संवेदनशील माहिती उघड होण्याच्या शक्यतेमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.