शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

नवाज शरीफ यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी

By admin | Updated: November 2, 2016 04:00 IST

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ दिवसेंदिवस अडचणीत येत चालले आहे.

इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ दिवसेंदिवस अडचणीत येत चालले आहे. त्यांच्या पनामा पेपर्स घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. न्यायाधीशाच्या नेतृत्वाखाली चौकशी आयोग नियुक्त करून, ही चौकशी करण्याचेही न्यायालयाने नमूद केले आहे. या न्यायालयीत आयोगाची कार्यकत्रा ठरविण्यासाठी पाकिस्तान सरकार आणि याचिकाकर्त्यांनी आपल्या सूचना सादर कराव्यात, पण कार्यकक्षा ठरविण्याबाबत दोघांमध्ये एकमत न झाल्यास आम्हीच ती निश्चित करू, असेही न्यायालयाने म्हटले आहे. मुख्य न्या. अन्वर झहीर जमाली यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांच्या पीठाने हा आदेश दिला, तेव्हा पाकिस्तान सरकारमधील अनेक मंत्री, वकील तसेच इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे नेते आणि पत्रकारांनी न्यायालयात प्रचंड गर्दी केली होती. नवाज शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावाचा पनामा पेपर्समध्ये उल्लेख आल्यानंतर इम्रान खान आणि इतर अनेकांनी या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी याचिका न्यायालयात केली आहे. (वृत्तसंस्था)>काय आहेत पनामा पेपर्स शरीफ आणि त्यांच्या घरातील व्यक्तींनी मनी लाँडरिंग केल्याचा आरोप आहे. त्या संदर्भातील पनामा पेपर्समध्ये नवाज यांच्या चारपैकी मरयम, हसन आणि हुसैन या तीन मुलांचा उल्लेख आहे. अनेक कंपन्यांतील आर्थिक व्यवहारांचे ते प्रमुख होते वा त्यांना त्या व्यवहारांचा अधिकार होता, असाही उल्लेख त्यात आहे.>आंदोलनावर बंदी नाहीदरम्यान, इम्रान खान यांच्या पक्षाने उद्या, बुधवारी इस्लामाबादमध्ये नवाज शरीफ सरकारच्या विरोधात मोठे आंदोलन करण्याचे ठरविले असून, त्यावर बंदी घालण्यास न्यायालयाने नकार दिला. सरकार आणि आंदोलक या दोघांनी संयम पाळावा, असे आवाहन न्यायालयाने केले. त्यानंतर बोलताना इम्रान खान म्हणाले की, आमचे उद्याचे आंदोलन ठरल्यानुसार होईलच. भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात आतापर्यंत ज्यांनी साथ दिली, त्यांचे आपण तयावेळी आभार मानणार आहोत. आपल्या समर्थकांना उद्देशून ते म्हणाले की आता तुम्ही शांतपणे घरी जा. तुम्हाला उद्या पुन्हा आभार प्रदर्शनासाठी यायचे आहे.नवाज शरीफ यांची चौकशी गुरुवारपासून सुरू होणार असल्यामुळे मी आनंदात आहे.