शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
3
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
4
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
5
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
6
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
8
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
9
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
10
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
12
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
13
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
14
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
15
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
16
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
17
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

Narendra Modi: मैदान तयार, आता वेळ तुमची; पंतप्रधान मोदी यांचे जगातील कॉर्पोरेट क्षेत्रास आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2023 7:12 AM

Narendra Modi: भारत आणि अमेरिका सरकार दोन्ही देशांच्या समुदायांसाठी आवश्यक व्यवस्था उभी केली आहे. त्याचा लाभ घेऊन भरभराट करून घेण्याची जबाबदारी उद्योग जगताची आहे,' असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

वॉशिंग्टन - भारत आणि अमेरिका सरकार दोन्ही देशांच्या समुदायांसाठी आवश्यक व्यवस्था उभी केली आहे. त्याचा लाभ घेऊन भरभराट करून घेण्याची जबाबदारी उद्योग जगताची आहे,' असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

वॉशिंग्टनच्या केनेडी सेंटरमध्ये शुक्रवारी भारत आणि अमेरिकेतील व्यावसायिक, समाजसेवक आणि भारतीय-अमेरिकी समुदायातील प्रमुख सदस्य यांची एक परिषद पार पडली. त्यावेळी मोदी बोलत होते.

यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मोदी यांनी म्हटले की, "भारत आणि अमेरिका यांच्यातील भागीदारी ही दृढ विश्वास, सामायिक दायित्व आणि संवेदना यावर आधारित आहे. संरक्षणापासून विमान वाहतुकीपर्यंत, व्यावहारिक सामग्रीपासून वस्तू उत्पादनापर्यंत आणि आयटीपासून अंतराळापर्यंत व्यापक क्षेत्रात भारत आणि अमेरिका विश्वसनीय भागीदार आहेत. व्यापारी समुदायाने पुढे येऊन या संधीचा पूरेपूर लाभ घ्यावा.' (वृत्तसंस्था)

गुगल ॲमेझॉन गुंतवणार २ लाख कोटी -

वॉशिंग्टन : गुगल आणि ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉन भारतात सुमारे २ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि ॲमेझॉनचे सीईओ अँडी जॅसी यांनी याबाबत माहिती दिली.

'पंतप्रधानांच्या स्वप्नातून मिळाली ब्लू प्रिंट'पंतप्रधानांच्या दूरदृष्टीचे कौतुक करताना सुंदर पिचाई म्हणाले की, त्यांचे डिजिटल भारताचे स्वप्न काळाच्या खूप पुढे आहे. त्यातून इतर देशांना काय करता येईल, त्याची ब्लू प्रिंट मिळते. सुंदर पिचाई आणि अँडी जैसी यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची औपचारिक भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर पिचाई यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी यांची भेट ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. भारतात डिजिटायझेशनसाठी १० अब्ज डॉलर म्हणजे सुमारे ८२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

- गुजरातची राजधानी गांधीनगर येथी गिफ्ट सिटी' येथे गुगलचे जागतिक फिनटेक केंद्र सरु करण्यात येईल.- भारतात गुगलचे पुणे, मुंबई, बंगळुरू, हैदराबाद, गुरगाव या ठिकाणी कार्यालये आहेत.

१.२ लाख कोटींची ॲमेझॉनची गुंतवणूकअँडी जॅसी यानी भारतात आणखी १.२ लाख कोटींची गुंतवणूक करण्याची योजना असल्याचे सांगितले. ॲमेझॉनने यापूर्वी १ लाख कोटींची गुंतवणूक केली आहे. आता ती २.२ लाख कोटी होईल, असे ते म्हणाले,

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSundar Pichaiसुंदर पिचईgoogleगुगलamazonअ‍ॅमेझॉनInvestmentगुंतवणूक