MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 17:07 IST2025-07-20T17:06:52+5:302025-07-20T17:07:45+5:30
MRI Machine Accident: आजाराचं निदान करण्यासाठी रुग्णांचं एमआरआय स्कॅन केलं जातं. मात्र हीच एमआरआय स्कॅन करणारी मशीन एका व्यक्तीसाठी जीवघेणी ठरली आहे. अमेरिकेतील लाँग आयलँड येथे एमआरआय मशीनमध्ये खेचले गेल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. एका छोट्याशा चुकीमुळे ही व्यक्ती एमआरआय मशीमध्ये जाऊन अडकली. तसेच तिथेच तडफडून तिचा मृत्यू झाला.

MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी
आजाराचं निदान करण्यासाठी रुग्णांचं एमआरआय स्कॅन केलं जातं. मात्र हीच एमआरआय स्कॅन करणारी मशीन एका व्यक्तीसाठी जीवघेणी ठरली आहे. अमेरिकेतील लाँग आयलँड येथे एमआरआय मशीनमध्ये खेचले गेल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. एका छोट्याशा चुकीमुळे ही व्यक्ती एमआरआय मशीमध्ये जाऊन अडकली. तसेच तिथेच तडफडून तिचा मृत्यू झाला.
याबाबत काही पाश्चात्य वृत्तसंस्थांमधून मिळालेल्या अधिक माहितीनुसार ६१ वर्षीय कीथ मॅकएलिस्टर हे वेबस्टरी येथील नासाऊमध्ये एका ओपन एमआरआय मशीनमध्ये अडकले. तसेच गंभीररीत्या जखमी झाले. त्यानंतर त्यांना हृदयविकाराचे अनेक झटके येऊन त्यातच त्यांचा मृत्यू झाला. गळ्यात घातलेली धातूची माळा त्यांच्यांसाठी जीवघेणी ठरण्याची प्राथमिक माहिती आहे. ही माळा घालून ते एमआरआय मशीनजवळ गेले होते. तेव्हा मशीनमधील शक्तिशाली लोहचुंबकांनी त्यांना आत खेचून घेतले.
कीथ यांची पत्नी एड्रियन जोन्स-मॅकलिस्टर यांनी सांगितले की, मी माझ्या गुडघ्याचं एमआरआय स्कॅन करण्यासाठी आले होते. एमआरआय केल्यानंतर मी तिथल्या तंत्रज्ञाला मला टेबलवरून खाली उतवरण्यास मदत करण्यासाठी माझ्या पतीला आत बोलावण्यास सांगितले. मात्र जेव्हा माझे पती मॅकएलिस्टर हे स्कॅनिंग रूममध्ये दाखल झाले. तेव्हा त्यांच्या गळ्यात २० पौंड वजनाची धातूची चेन होती. ते रूममध्ये येताच एमआरआय मशीनच्या शक्तिशाली चुंबकाने त्यांना आत खेचून घेतले. या यंत्राने त्यांना गिळून टाकलं असं तेव्हा मला वाटलं. त्यानंतर मॅकएलिस्टर यांना हृदयविकाराचे पाठोपाठ झटके आले आणि त्यांचा मृत्यू झाला.
याबाबत मॅकएलिस्टर यांच्या मुलांनी तिथल्या तंत्रज्ञाना दोषी ठरवले आहे. त्यांनी फेसबूकवर लिहिले की, जेव्हा माझी आई एमआरआय स्कॅन करण्यााठी झोपली होती. तेव्हा तिला खाली उतरण्यास मदत करण्यासाठी तिथला तंत्रज्ञ माझ्या वडिलांना त्या खोलीत घेऊन आला. मात्र त्यांच्या गळ्यात असलेली चेन त्यांनी उतरवून ठेवली पाहिजे हे सांगण्यास तो विसरला. त्यामुळे हा अपघात झाला, असा आरोप त्यांनी केला.