बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 18:30 IST2025-07-18T18:28:20+5:302025-07-18T18:30:12+5:30

या प्रकरणात दोन मठाधिपतींना तुरुंगात पाठवण्यात आले आहे. सिनेट समितीने महिलेवर फौजदारी खटला चालवण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. तसेच, अनेक लोक भिक्षूंविरुद्ध कारवाईची मागणी करत आहेत. 

More than 80 thousand pornographic photos and videos of Buddhist monks; Woman in Thailand earns 102 crores by blackmailing them | बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी

बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी

 thailand woman blackmails buddhist monks in massive sex scandal
थायलंडमध्ये बौद्ध भिक्षूंना लैंगिक संबंधात गुंतवून ब्लॅकमेल करणाऱ्या एक मोठ्या रॅकेटचा पोलिसांनी भांडाफोड केला आहे. विलवान एम्सावत नावाच्या एका ३५ वर्षीय महिलेने बौद्ध भिक्षूंसोबत शारीरिक संबंध ठेवले, त्याचे फोटो तथा व्हिडिओ बनवले आणि नंतर, त्यांना ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे. 

पोलिसांनी संबधित महिलेला तिच्या बँकॉकमधील नॉनथाबुरी येथील आलीशान घरातून अटक केली आहे. तिच्या मोबाईलमधून अनेक बौद्ध भिक्षूंसोबत सेक्स करतानाचे व्हिडिओ आणि फोटोज मिळाले आहे. एढेच नाही. तर ब्लॅकमेलिंगचे चॅटही मिळाले आहे. महिलेच्या घरातून पोलिसांनी 80 हजारहून अधिक न्यूड फाइल्स देखील जप्त केल्या आहेत. याचा वापर ती बौद्ध भिक्षूंना ब्लॅकमेल करण्यासाठी करत होती.

जूनमध्ये उघडकीस आली पहिली घटना - 
जूनमध्ये बँकॉकमधील एका बौद्ध मठाचे मठाधिपती अचानक बेपत्ता झाल्यानंतर, हे प्रकरण उघडकीस आले. एका महिलेने ब्लॅकमेल केल्यानंतर ते वाट त्रि थोत्साथेप मठातून निघून गेले, असे पोलिसांनी म्हटले आहे. आता आरोपी महिलेने दावा केला आहे की मठाधिपती तिच्या मुलाचा पिता आहे. या घोटाळ्यात एवढ्या मोठ्या संख्येने बौद्ध भिक्षूंची नावे समोर आल्यानंतर लोकांमध्ये संतापाची लाट आहे.

या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांने दावा केला आहे की, गेल्या ३ वर्षात या महिलेने बौद्ध भिक्षूंना ब्लॅकमेल करून सुमारे १०२ कोटी रुपये कमावले. रॉयल थाई पोलिसांच्या केंद्रीय अन्वेषण ब्युरोने दिलेल्या माहितीनुसार, या घोटाळ्यात सहभागी असलेल्या सुमारे ९ मठाधिपतींना पदावरून काढून टाकण्यात आले आहे. महिलेवर खंडणी, मनी लाँड्रिंग आणि चोरीच्या वस्तू मिळवण्याचा आरोप आहे.

या प्रकरणात दोन मठाधिपतींना तुरुंगात पाठवण्यात आले आहे. सिनेट समितीने महिलेवर फौजदारी खटला चालवण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. तसेच, अनेक लोक भिक्षूंविरुद्ध कारवाईची मागणी करत आहेत. 

Web Title: More than 80 thousand pornographic photos and videos of Buddhist monks; Woman in Thailand earns 102 crores by blackmailing them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.