शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

इराणसोबत संघर्षादरम्यान ‘या’ ठिकाणी जाणवले १०० हून अधिक भूकंपाचे धक्के, अमेरिकेने केली अणुचाचणी?  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 13:57 IST

Iran War: इस्राइल आणि अमेरिकेने इराणविरोधात सुरू केलेल्या लष्करी कारवाईमुळे आखाती देशात भीषण संघर्षाला तोंड फुटले आहे. यादरम्यान, अमेरिकेतील नेवाडा प्रांतामध्ये १०० हून अधिक भूकंपाचे धक्के जाणवल्याने खळबळ उडाली आहे.

इस्राइल आणि अमेरिकेने इराणविरोधात सुरू केलेल्या लष्करी कारवाईमुळे आखाती देशात भीषण संघर्षाला तोंड फुटले आहे. यादरम्यान, अमेरिकेतील नेवाडा प्रांतामध्ये १०० हून अधिक भूकंपाचे धक्के जाणवल्याने खळबळ उडाली आहे. ज्या ठिकाणी हे भूकंपाचे धक्के जाणवले त्या ठिकाणी अण्वस्रे ठेवण्यात आली होती, असे सांगण्यात येत आहे. या गोपनीय ठिकाणाबाबत जगाला फारच त्रोटक माहिती आहे. या भागाला एरिया-५२ म्हणून ओळखले जाते. हा भाग अणुचाचण्यांसाठी प्रसिद्ध असल्याने आणि इथेच भूकंप झाल्याने इराणसोबतच्या संघर्षादम्यान, इराणने अणुचाचणी केली आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नेवाडामधील या भागाला टोनोपा टेस्ट रेंज म्हणून ओळखले जाते. गेल्या आठवडाभरात येथे १०० हून अधिक भूकंपाच्या झटक्यांची नोंद झाली आहे. तसेच हे वृत्त समोर आल्यापासून जगभरात खळबळ उडाली आहे. आपण इराणला अणुबॉम्ब तयार करू देणार नाही, असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळेच इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खामेनेई यांच्या हत्येनंतरही अमेरिकेने इराणवरील हल्ले कमी केलेले नाहीत. मात्र अमेकिरेला प्रत्युत्तर म्हणून इराणही ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे प्रतिहल्ले करत आहे.

याबाबत द सन या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार रविवारी दुपारपासून सोमवारी सकाळपर्यंत सातत्याने भूकंपाचे जाणवत होते. ज्या ठिणाकी अण्वस्त्रे ठेवली आहेत ते ठिकाण लास वेगासपासून सुमारे तीन तास उत्तर पूर्वेस आणि एरिया ५१ पासून अगदी जवळ आहे.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर अनेक आठवड्यांपर्यंत हल्ले करण्याचे संकेत दिले आहेत. मात्र सर्वोच्च नेत्याच्या मृत्यूनंतरही इराण माघार घेण्यास तयार नसल्याने हे युद्ध कसे थांबणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यात इराणच्या प्रतिहल्ल्यात अमेरिकेचीही हानी होत आहेत. या संघर्षात आतापर्यंत काही अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाला आहे. मात्र वेळ पडल्यास इराणमध्ये लष्कर पाठवण्यासही मागे पुढे पाहिलं जाणार नाही, ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. तसेच जोपर्यंत इराणची अण्वस्र क्षमता संपुष्टात येत नाही, तोपर्यंत हल्ले सुरूच ठेवले जातील, असे संकेतही ट्रम्प यांनी दिले आहेत.  

English
हिंदी सारांश
Web Title : Nevada tremors spark nuclear test fears amid US-Iran tensions.

Web Summary : Over 100 tremors in Nevada, near Area 52, raise concerns about US nuclear tests amidst escalating US-Iran conflict. Iran retaliates with drone strikes.
टॅग्स :warयुद्धIranइराणUnited Statesअमेरिका