Mexico Violence: मेक्सिकोत गाड्यांची जाळपोळ आणि रस्ते रोख सुरू; भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 11:50 IST2026-02-23T11:46:15+5:302026-02-23T11:50:26+5:30
मेक्सिकोमधील कुख्यात ड्रग माफिया आणि जलिस्को न्यू जनरेशन कार्टेलचा प्रमुख नेमेसियो रुबेन ओसेगुएरा सर्व्हेंटेस उर्फ एल मेंचो लष्करी कारवाईत मारला गेल्यानंतर तिथे प्रचंड हिंसाचार उसळला आहे. या पार्श्वभूमीवर, मेक्सिकोमधील भारतीय दूतावासाने भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत.

Mexico Violence: मेक्सिकोत गाड्यांची जाळपोळ आणि रस्ते रोख सुरू; भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना
मेक्सिकोतील कुख्यात ड्रग माफिया आणि जलिस्को न्यू जनरेशन कार्टेलचा प्रमुख नेमेसियो रुबेन ओसेगुएरा सर्व्हेंटेस उर्फ एल मेंचो लष्करी कारवाईत ठार झाला. या घटनेनंतर देशातील अनेक भागांत हिंसाचार भडकला असून सुरक्षा यंत्रणा सतर्क करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मेक्सिकोतील भारतीय नागरिकांसाठी अॅडव्हायझरी जारी करण्यात आली आहे. परिस्थिती लक्षात घेता अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडेच लक्ष द्यावे, असेही सांगण्यात आले आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
मेक्सिकन संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, जलिस्को प्रांतात झालेल्या विशेष कारवाईत एल मेंचो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी मॅक्सिको शहरात हलवले जात असताना त्याचा मृत्यू झाला. एल मेंचो हा जगातील सर्वाधिक वाँटेड ड्रग तस्करांपैकी एक होता. त्याच्या संघटनेचे जाळे अमेरिकेतील सर्व ५० राज्यांपर्यंत पसरले होते आणि सुरक्षा दलांवर थेट हल्ले करण्यासाठी ती प्रसिद्ध होती.
Dear all Indian nationals in Mexico:
— India in México (@IndEmbMexico) February 22, 2026
There are ongoing security operations and related road blockages and criminal activity, Indian nationals in Jalisco State (areas of Puerto Vallarta, Chapala, and Guadalajara), Tamaulipas State (areas of Reynosa and other municipalities),…
एल मेंचोच्या मृत्यूनंतर त्याच्या समर्थकांनी अनेक शहरांत रस्ते अडवून आंदोलन सुरू केले असून सुरक्षा दलांशी चकमकी सुरू आहेत. दरम्यान, प्वेर्टो वल्लार्टा, चापाला आणि ग्वाडालजारासह अनेक भागांत रस्त्यावरील वाहने पेटवण्यात आल्या असून विमानतळ, पेट्रोल पंपसह अनेक महत्त्वाच्या ठिकाणी हल्ले करण्यात आले आहेत.
भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना:
- गर्दीची ठिकाणे टाळावीत आणि पुढील सूचना मिळेपर्यंत सुरक्षित ठिकाणी राहावे.
- आपल्या स्थानाची माहिती कुटुंबीय व मित्रांना फोन, संदेश किंवा सोशल मीडियाद्वारे देत राहावी.
- स्थानिक माध्यमांतील बातम्या आणि अधिकाऱ्यांच्या सूचनांवर लक्ष ठेवावे.
- कोणत्याही मदतीसाठी भारतीय दूतावासाच्या +52 55 4847 7539 या क्रमांकावर किंवा स्थानिक आपत्कालीन क्रमांक 911 वर संपर्क साधावा.