शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

मनोरुग्ण सामान्यांपेक्षा तिप्पट धूम्रपान करतात

By admin | Updated: June 7, 2015 01:27 IST

मानसिक आजार असलेले लोक सामान्य लोकांपेक्षा तीनपट अधिक धूम्रपान करतात. पब्लिक हेल्थ इंग्लंड (पीएचई) आणि नॅशनल हेल्थ सर्व्हिसने

लंडन : मानसिक आजार असलेले लोक सामान्य लोकांपेक्षा तीनपट अधिक धूम्रपान करतात. पब्लिक हेल्थ इंग्लंड (पीएचई) आणि नॅशनल हेल्थ सर्व्हिसने (एनएचएस) केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली. धूम्रपानामुळे मानसिक अस्वस्थता वाढू शकते, तसेच रुग्ण घेत असलेल्या औषधांचा प्रभाव ५० टक्क्यांनी कमी होऊ शकतो. त्यामुळे मनोविकार रुग्णालये धूम्रपानवर्जित क्षेत्र घोषित केले जावे, असे पीएचईचे म्हणणे आहे; मात्र स्मोकर्सच्या (धूम्रपान करणारे) अधिकारांची बाजू घेणारी संघटना फॉरेस्टला हे मान्य नाही. मानसिक आरोग्य केंद्रात उपचार घेत असलेल्या रुग्णांनाही धूम्रपानासाठी सामान्य नागरिकांप्रमाणे स्वातंत्र्य मिळायला हवे, असे या संघटनेचे म्हणणे आहे. पीएचईच्या सर्व्हेनुसार, मानसिक आजाराच्या जवळपास ६४ टक्के रुग्णांना तंबाखूचे व्यसन आहे, तर सामान्य लोकांत केवळ १८ टक्के लोकांनाच हे व्यसन आहे. (वृत्तसंस्था)ब्रिटनमधील नऊ टक्के मानसिक आरोग्य केंद्रांना यापूर्वीच धूम्रपानवर्जित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. धूम्रपानाच्या व्यसनामुळे मनोरुग्णांचे आयुष्य दहा ते २० वर्षांनी घटू शकते. जे लोक धूम्रपान सोडतात, त्यांचा आत्मविश्वास वाढतो, असे लंडनमधील मॉडस्ले रुग्णालयाच्या मॅरी येट्स यांनी सांगितले. मात्र, मानसिक आजार असलेल्या गॅरी नेव्हन यांना मानसिक आरोग्य केंद्रात धूम्रपान न करणे मान्य नाही. त्या म्हणाल्या, आम्ही चांगले वाटावे यासाठी रुग्णालयात येतो. कधी कधी सिगारेट ओढल्यामुळे चांगले वाटते. स्मोकर्स गु्रपचे संचालक सायमन क्लार्क यांनी मानसिक आरोग्य केंद्रांना धूम्रपान वर्जित क्षेत्र घोषित करण्याच्या पीएचईच्या सल्ल्याची निंदा केली. ते म्हणाले, धूम्रपानामुळे चिंता आणि तणाव कमी होतो, असे धूम्रपान करणाऱ्या अनेकांचे म्हणणे आहे.