"राष्ट्राध्यक्षांना लक्ष्य करणे चुकीचे"; अयातुल्ला खामेनींच्या मृत्यूनंतर पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 19:43 IST2026-03-01T19:38:12+5:302026-03-01T19:43:59+5:30

खामेनींच्या मृत्यूनंतर पाकिस्तानात उद्रेक सुरु झाला असून आंदोलकांकडून अमेरिकन दूतावास पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Martyrdom of Ayatollah Khamenei Pakistan PM Shehbaz Sharif Condemns Killing Backs Iran | "राष्ट्राध्यक्षांना लक्ष्य करणे चुकीचे"; अयातुल्ला खामेनींच्या मृत्यूनंतर पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा संताप

"राष्ट्राध्यक्षांना लक्ष्य करणे चुकीचे"; अयातुल्ला खामेनींच्या मृत्यूनंतर पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा संताप

Shehbaz Sharif on Ayatollah Khamenei: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा अमेरिका आणि इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर पाकिस्तानात हिंसक पडसाद उमटले आहेत. खामेनी यांच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या आंदोलकांनी पाकिस्तानातील अनेक शहरांमध्ये राडा केला असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस आणि लष्कराला गोळीबार करावा लागला आहे. या संघर्षात आतापर्यंत १९ आंदोलकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दुसरीकडे, खोमेनी यांच्या मृत्यूनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान  शहबाज शरीफ यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. 

अमेरिकन दूतावासावर हल्ला करण्याचा प्रयत्न

खामेनी यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ पाकिस्तानात शिया समुदायाकडून मोठ्या प्रमाणावर आंदोलने केली जात आहेत. अनेक आंदोलकांनी थेट अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलांनी बळाचा वापर केला, ज्यामध्ये १९ जणांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानच्या विविध प्रांतांत सध्या तणावपूर्ण शांतता असून लष्कराचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी व्यक्त केला शोक

एककीकडे पाकिस्तानात हिंसाचार सुरू असतानाच, दुसरीकडे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी अधिकृतपणे शोक व्यक्त केला. त्यांनी एक्स पोस्ट करत खामेनी यांच्या मृत्यूला शहादत असे म्हटले आहे. "इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला सय्यद अली खामेनी यांच्या शहादतीवर आम्ही शोक व्यक्त करतो. या कठीण काळात पाकिस्तान सरकार आणि जनता इराणच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे," असे शरीफ यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

आंतरराष्ट्रीय कायद्याच्या उल्लंघनावर चिंता

शहबाज शरीफ यांनी अमेरिका आणि इस्रायलच्या या कारवाईवर टीका करत आंतरराष्ट्रीय कायद्याच्या उल्लंघनाबाबत चिंता व्यक्त केली आहे. "कोणत्याही देशाच्या राष्ट्रप्रमुखाला किंवा प्रमुखाला अशा प्रकारे लक्ष्य न करण्याची जुनी परंपरा आहे. अशा कारवाया आंतरराष्ट्रीय नियमांच्या विरोधात आहेत," असे मत त्यांनी व्यक्त केले.

Web Title : खामेनी की मौत के बाद पाकिस्तान पीएम ने नेताओं को निशाना बनाने की निंदा की; विरोध प्रदर्शन भड़के।

Web Summary : अयातुल्ला खामेनी की मौत के बाद पाकिस्तान में विरोध प्रदर्शन भड़क उठे, जिससे हताहत हुए। पीएम शरीफ ने शोक व्यक्त किया, राष्ट्रीय नेताओं को निशाना बनाने की अंतरराष्ट्रीय कानून का उल्लंघन बताया।

Web Title : Pakistan PM condemns targeting leaders after Khamenei's death; protests erupt.

Web Summary : Following Ayatollah Khamenei's death, protests erupted in Pakistan, leading to casualties. PM Sharif expressed grief, condemning the targeting of national leaders as a violation of international law.