Mark Zuckerberg : मार्क झुकेरबर्ग यांच्या सुरक्षेवर १७२ कोटींचा झाला खर्च
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2021 06:02 IST2021-04-13T06:01:35+5:302021-04-13T06:02:00+5:30
Mark Zuckerberg : फेसबुक कंपनीच्या सुरक्षेचा वार्षिक आढावा घेण्यात आला. मार्क झुकरबर्ग यांना ‘नेमक्या धमक्या’ असल्याचे स्पष्टीकरण निवेदनात करण्यात आले आहे.

Mark Zuckerberg : मार्क झुकेरबर्ग यांच्या सुरक्षेवर १७२ कोटींचा झाला खर्च
वॉशिंग्टन : फेसबुक या समाज माध्यमाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांच्या सुरक्षेसाठी २०२० मध्ये २३ दशलक्ष डॉलर्सपेक्षाही (साधारण १७२ कोटी रुपये) जास्त खर्च झाला. ही माहिती सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनकडे फेसबुकने सादर केलेल्या दस्तावेजात दिली गेली आहे.
फेसबुक कंपनीच्या सुरक्षेचा वार्षिक आढावा घेण्यात आला. मार्क झुकरबर्ग यांना ‘नेमक्या धमक्या’ असल्याचे स्पष्टीकरण निवेदनात करण्यात आले आहे. फेसबुक आणि झुकरबर्ग हे समानार्थी शब्द असल्यामुळे आमच्या कंपनीबद्दल नकारात्मक भावना ही थेटपणे झुकरबर्ग यांच्याशी संबंधित असते व ती त्यांच्याकडेच जाते. मार्क झुकरबर्ग आणि त्यांच्या कुटुंबाच्या संरक्षणाचा खर्च हा २०२० मध्ये खूपच वाढला. कारण, कोविड-१९ प्रवासाची आचारसंहिता, २०२० मध्ये अमेरिकेच्या अध्यक्षांच्या निवडणुकीत सुरक्षेवर झालेला वाढीव खर्च, सुरक्षा कर्मचाऱ्यांवरील वाढलेला खर्च आणि इतर वेळी सुरक्षेबाबतची जोखीम फेसबुकच्या वार्षिक सुरक्षा आढाव्यात स्पष्ट झाली.
२३ दशलक्ष डॉलर्स
झुकेरबर्ग यांची त्यांच्या निवासस्थानी सुरक्षा, कुटुंबाचा प्रवास यावर खर्च झाले.