भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 09:25 IST2025-05-17T09:24:09+5:302025-05-17T09:25:16+5:30

नूर खान हा सामान्य एअरबेस नाही. इथं पाकिस्तानातील VVIP आणि हायलेव्हल मिलिट्री एविशन सेंटर आहे.

Many airbases including Noor Khan destroyed in Indian attack; Pakistani PM Shahbaz Sharif's confession | भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा

भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा

कराची - पहलगाम हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तानातील दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर लॉन्च केले. या हल्ल्याने बिथरलेल्या पाकिस्ताननेभारताच्या सीमेवरील नागरी वस्तीत हल्ल्याचा प्रयत्न केला. भारतीय लष्कराने हे हल्ले परतावून लावले मात्र पाकच्या नापाक कृतीला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानातील अनेक सैन्य तळांना टार्गेट केले. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्याने केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले. स्वत: पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी याची कबुली दिली. भारताच्या हल्ल्यात नूर खान एअरबेससह अनेक ठिकाणे उद्ध्वस्त झाली. पाकिस्तानी पंतप्रधानांचा हा कबुलीनामा जगासमोर आला आहे.

जो पाकिस्तान कालपर्यंत विजयाच्या बाता मारत होते. भारताविरुद्ध युद्धात पाकिस्तानचा विजय झाला असा खोटा दावा करत होते. यातूनच पाकिस्तानी नागरिक सेलीब्रेशन करत होते. मात्र पाक पंतप्रधानांच्या या विधानामुळे युद्धात पाकिस्तानलाच मोठा फटका बसला हे सिद्ध झाले. शहबाज शरीफ यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात ते म्हणतात की, ९ आणि १० तारखेच्या रात्री अडीच वाजता जनरल असीम मुनीर यांनी मला फोन करून भारताने बॅलेस्टिक मिसाईलने हल्ले सुरू केलेत, ज्यातील एक मिसाईल नूर खान एअरबेसवर पडली असं सांगितले. आमच्या वायूसेनेने देशाला वाचवण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर केला. त्याशिवाय चीनी लढाऊ विमानांचा वापर केला असं शरीफ यांनी कबूल केले.

सर्वात महत्त्वाचा नूर खान एअरबेस

नूर खान हा सामान्य एअरबेस नाही. इथं पाकिस्तानातील VVIP आणि हायलेव्हल मिलिट्री एविशन सेंटर आहे. इस्लामाबादपासून नजीक असलेला हा एअरबेस पाकिस्तानातील संवेदनशील भागात येतो. आतापर्यंत हल्ल्यानंतर आलेल्या सॅटेलाईट फोटोत भारतीय सैन्याचा हल्ला अगदी अचूक होता हे दिसून आले. भारताने निश्चित केलेल्या टार्गेटवर हल्ला यशस्वी केला. इस्लामाबाद येथील नूर खान एअरबेस, पाकिस्तानी हवाई दलाला ऑपरेशन्सवेळी मदत करते. स्पेस कंपनीसह अनेक सॅटेलाईट कंपन्यांनी या एअरबेसचे हल्ला झाल्यानंतरचे फोटो प्रकाशित केले आहेत. 

दरम्यान, पाकिस्तान कसा दहशतवादाचा पोशिंदा आहे, हे ठसवण्यासाठी आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती देण्यासाठी जगातील प्रमुख ७-८ देशांमध्ये खासदारांची शिष्टमंडळे पाठविण्याची केंद्रातील मोदी सरकारची योजना आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या स्थायी समितीतील सर्वपक्षीय सदस्यांचा या शिष्टमंडळात समावेश असेल. एका शिष्टमंडळात पाच-सहा खासदार असतील. अशा ७-८ शिष्टमंडळांना वेगवेगळ्या देशात पाठविले जाणार आहे.

Web Title: Many airbases including Noor Khan destroyed in Indian attack; Pakistani PM Shahbaz Sharif's confession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.