पत्नीला मारण्यासाठी घरावर त्याने चक्क विमान आदळवले....पुढे बघा काय झाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 08:35 IST2018-08-15T08:34:16+5:302018-08-15T08:35:54+5:30

अमेरिकेच्या उटा शहरामध्ये ही घटना घडली.

man crashes plane into his own home to kill his wife...What happened next? | पत्नीला मारण्यासाठी घरावर त्याने चक्क विमान आदळवले....पुढे बघा काय झाले?

पत्नीला मारण्यासाठी घरावर त्याने चक्क विमान आदळवले....पुढे बघा काय झाले?

उटा : अमेरिकेमध्ये पती-पत्नीच्या वादाचा एक भयानक किस्सा समोर आला आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नीला मारण्यासाठी आपल्याच घरावर चक्क विमान नेऊन आदळवल्याची घटना घडली. यामध्ये त्याची पत्नी वाचली मात्र, त्या व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागले.

 अमेरिकेच्या उटा शहरामध्ये ही घटना घडली. पोलिसांनी सांगितले की, विमान घरावर आदळल्यानंतर तेथे आग लागली. यातून त्याची पत्नी आणि एक बालक तेथून सुखरुप बाहेर आले. या व्यक्तीचे नाव ड्युएन यूड असे आहे. विमान घरावर आदळल्यानंतर घराच्या समोरील भागाला आग लागली. 

मिडियानुसार या घटनेच्या काही तासांपूर्वीच यूड याला कौटुंबिक हिंसेच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. मात्र, त्याला जामिनावर सोडण्यात आले होते. यूड याच्यावर पत्नीला मारहाण केल्याचा आरोप होता. पोलिसांनी सांगितले की, यूड ज्या कंपनीत काम करत होता, त्याच कंपनीचे हे विमान होते. 


 सांगितले जात आहे की, यूड एक अनुभवी पायलट होता. त्याला रविवारी पत्नीला मारहाणीच्या आरोपाखाली अटक झाली होती. जामीन मिळाल्यानंतर यूड कंपनीमध्ये गेला होता व त्यानंतर त्याने विमानाचे घराच्या दिशेने उड्डाण केले.

Web Title: man crashes plane into his own home to kill his wife...What happened next?