पाकिस्तानला मलेशियानं दिला झटका; पैसे दिले नाही म्हणून विमान केलं जप्त, प्रवाशांनाही उतरवलं

By जयदीप दाभोळकर | Published: January 15, 2021 03:28 PM2021-01-15T15:28:40+5:302021-01-15T15:32:29+5:30

मलेशियानं एकतर्फी निर्णय घेतल्याचं पाकिस्तानचा आरोप

Malaysian authorities seize PIA aircraft at Kuala Lumpur Airport for not paying lease money | पाकिस्तानला मलेशियानं दिला झटका; पैसे दिले नाही म्हणून विमान केलं जप्त, प्रवाशांनाही उतरवलं

पाकिस्तानला मलेशियानं दिला झटका; पैसे दिले नाही म्हणून विमान केलं जप्त, प्रवाशांनाही उतरवलं

Next
ठळक मुद्देमलेशियानं एकतर्फी निर्णय घेतला, पाकिस्तानचा आरोपप्रवासासाठी विमानात बसलेल्या नागरिकांनाही उतरवलं

आर्थिक चणचणीचा सामना करणाऱ्या पाकिस्तानला मित्र म्हणवणाऱ्या मलेशियानंच एक मोठा झटका दिला आहे. पाकिस्तानची सरकारी विमान कंपनी पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सचं बोईंग ७७७ हे विमानमलेशियानं जप्त केलं आहे. पाकिस्तानच्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्ताननं हे विमान भाडेतत्त्वावर घेतलं होतं. परंतु पाकिस्ताननं याचे पैसे न दिल्यामुळे हे विमान मलेशियानं जप्त केलं. क्वालालंपूर येथून हे विमान उड्डाणाची तयारी करतानाच मलेशियानं हे विमान जप्त केलं. तसंच यातील चालक दल, कर्मचारी आणि प्रवाशांनाही विमानतळावर उतरवण्यात आलं.

पाकिस्तानचं वृत्तपत्र डेली टाईम्सच्या वृत्तानुसार पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सकडे सध्या १२ बोईंग ७७७ विमानं आहेत. ही विमानं त्यांनी वेळोवेळी कंपन्यांकडून ड्राय लीजवर घेतली आहेत. जे विमान मलेशियानं जप्त केलं तेदेखील भाडेतत्त्वारच घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. परंतु अटींप्रमाणे रक्कम न भरल्यानं हे विमान क्वालालंपूर विमानतळावर जप्त करण्यात आलं. यापूर्वी इम्रान खान सरकारकडून सौदी अरेबियानं ३ अब्ज डॉलर्स परत मागितले होते. पाकिस्ताननं यासाठी चीनकडून कर्ज घेतलं होतं. तर दुसरीकडे पीआयएनं यासंदर्भात एक ट्विट करत मलेशियानं एकतर्फी निर्णय घेत हे विमान जप्त केल्याचं म्हटलं आहे. तसंच त्यांचं हे कृत्य अयोग्य असल्याचंही त्यांनी सांगितलं.



गेल्या वर्षी कराचीतील एका डोंगरावर पीआयच्या विमानाचा अपघात झाला होता. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सनं यासंदर्भात वेळोवेळी निरनिराळे खुलासे केले होते. पाकिस्तानचे नागरी उड्डाण मंत्री सरवर खान यांनी काही दिवसांपूर्वी पीआयएचे ४० टक्के वैमानिक वनावट परवानाधारक असल्याचं म्हटलं होतं. 

Web Title: Malaysian authorities seize PIA aircraft at Kuala Lumpur Airport for not paying lease money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.