इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 23:51 IST2025-06-21T23:41:33+5:302025-06-21T23:51:07+5:30

इराणच्या इसफहान येथील अणु ठिकाणांना लक्ष्य केले. या हल्ल्यात तेहरानचे किमान तीन वरिष्ठ कमांडर मारले गेल्याचे इस्रायलने म्हटले आहे.

Major attack on Iran; Israel kills Khamenei's commander again; Nuclear scientist also dies | इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू

इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू

इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध थांबण्याची चिन्हे सध्या दिसत नाहीत. इस्रायलने शनिवारी जाहीर केले की ते दीर्घकाळासाठी युद्धाच्या तयारीमध्ये आहेत. इस्रायली लष्कराने दावा केला आहे की, त्यांनी रात्री इराणच्या इसफहान येथील अणु ठिकाणांना लक्ष्य केले. या हल्ल्यात तेहरानचे किमान तीन वरिष्ठ कमांडर मारले गेल्याचे इस्रायलने म्हटले आहे. तर, एका अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे.

इसफहानचे डेप्युटी गवर्नर फॉर सिक्योरिटी अफेयर अकबर सालेही यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे की, इस्रायलने अणु संशोधन सुविधेचे नुकसान केले आहे. मात्र, त्यांनी कोणतीही जीवितहानी झाल्याचे सांगितले नाही. इस्रायली लष्कराने इसफहानच्या या अणुभट्टीला दुसऱ्यांदा लक्ष्य केले आहे. युद्ध सुरू झाल्याच्या २४ तासांच्या आतच इस्रायलने या ठिकाणावर एकदा हल्ला केला होता.

इस्रायलचे लक्ष्य: इराणची अणुक्षमता नष्ट करणे!
इस्रायलचे म्हणणे आहे की, त्यांना इराणची अणुक्षमता पूर्णपणे नष्ट करायची आहे. इस्रायलने पुन्हा एकदा इराणवर हल्ला केला आणि दक्षिण-पश्चिम भागात बॉम्बस्फोटांचे आवाज ऐकू आले. प्रत्युत्तर म्हणून इराणनेही पुन्हा ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले सुरू केले. उत्तर इस्रायलमधील एका दुमजली इमारतीवर ड्रोन हल्ला करण्यात आला, ज्यात ती इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे.

इस्रायली अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, इराणकडून होणारे हल्ले आकाशातच थोपवले जात आहेत. त्यांच्यासाठी इस्रायलवर हल्ला करणे खूप कठीण आहे. त्यांनी असेही म्हटले की, इराणकडे ताकद नाही, हे नाकारता येणार नाही. आजच इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची यांनी म्हटले होते की, जर या युद्धात अमेरिकाही सामील झाली, तर ते सर्वांसाठी खूप धोकादायक ठरेल.

बंडखोरांची अमेरिकेला धमकी
रिपोर्टनुसार, १३ जून रोजी इस्रायलने इराणच्या लष्करी आणि अणु ठिकाणांवर अचानक हल्ला केला होता. या हल्ल्यात इराणचे अनेक उच्च कमांडर आणि अणुवैज्ञानिकही मारले गेले होते. यानंतर इराणनेही इस्रायलवर हल्ले सुरू केले. इराणच्या आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे की, इस्रायली हल्ल्यांमध्ये किमान ४०० लोकांचा मृत्यू झाला आहे, तर ३ हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. इराण समर्थित हुती बंडखोरांनी धमकी दिली आहे की, जर ट्रम्प प्रशासनाने इराणविरोधात इस्रायलच्या लष्करी कारवाईत सहभाग घेतला, तर ते लाल समुद्रात अमेरिकी जहाजे आणि युद्धनौकांवरील हल्ले पुन्हा सुरू करतील.

Web Title: Major attack on Iran; Israel kills Khamenei's commander again; Nuclear scientist also dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.