पूर्व कांगो लोकशाही प्रजासत्ताक देशाातील रुबाया कोल्टन खाणीमध्ये भीषण भूस्खलन होऊन मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत सुमारे २२७ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये महिला आणि मुलांचाही समावेश आहे. शेकडो लोक खाणीमध्ये काम करत असताना खाणीमधील माती खचून ही दुर्घटना झाल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली.
या प्रांतामधील बंडखोर गटाकडून नियुक्त करण्यात आलेल्या गव्हर्नरचे प्रवक्ते लुबुम्बा काम्बेरे मुइसा यांनी सांगितले की, खाणीमध्ये भूस्खलन झालं तेव्हा खाणीमध्ये कामगारांसोबतच मुले आणि बाजारामध्ये काम करणाऱ्या महिलाही उपस्थित होत्या. दुर्घटनेनंतर काही लोकांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले. त्यामधील सुमारे २० जखमींवर उपचार सुरू आहेत.
तर एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी संध्याकाळपर्यंत मृतांची संख्या किमान २२७ पर्यंत पोहोचली होती. मात्र हा आकडा वाढू शकतो. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. पण सतत पडत असलेला पाऊस आणि ठिसूळ जमिनीमुळे मदत कार्यामध्ये अडचणी येत आहेत.
Web Summary : A devastating landslide in a Congo mine has killed at least 227 people, including women and children. The incident occurred in the Rubaya Colton mine during work, with rescue efforts hampered by rain and unstable ground. The death toll is expected to rise.
Web Summary : कांगो की एक खदान में विनाशकारी भूस्खलन से महिलाओं और बच्चों सहित कम से कम 227 लोगों की मौत हो गई। यह घटना रुबाया कोल्टन खदान में काम के दौरान हुई, बचाव कार्य बारिश और अस्थिर जमीन के कारण बाधित है। मरने वालों की संख्या बढ़ने की आशंका है।