mahatma gandhi may appear on britain coins soon  rishi sunak support campaign | भारताच्या नोटांनंतर आता इंग्लंडच्या नाण्यांवरही दिसणार महात्मा गांधी? खुद्द ब्रिटिश अर्थमंत्र्यांनी केली शिफारस

भारताच्या नोटांनंतर आता इंग्लंडच्या नाण्यांवरही दिसणार महात्मा गांधी? खुद्द ब्रिटिश अर्थमंत्र्यांनी केली शिफारस

ठळक मुद्देइग्लंडचे अर्थमंत्री ऋषी सुनक यांनी यासंदर्भात रॉयल मिंट अॅडव्हायजरी कमिटीला (RMAC) एक पत्र लिहिले आहे.सुनक यांनी हे पत्र, 'वुई टु बील्ट ब्रिटेन' (आम्हीही ब्रिटन घडवला) कॅम्पेनच्या समर्थनार्थ लिहिले आहे. ब्रिटिश नाण्यावर महात्मा गांधी यांच्या छायाचित्रासंदर्भात ऑक्टोबर 2019 मध्ये माजी मंत्री साजिद जाविद यांनी सर्वप्रथ विचार मांडला होता.

लंडण -भारतातील नोटांबरोबरच आता इंग्लंडमधील नाण्यांवरही महात्मा गांधी दिसणार आहेत. अर्थमत्री ऋषी सुनक यांच्या कार्यालयाने शनिवारी यासंदर्भात माहिती दिली. कार्यालयाने म्हटले आहे, की कृष्ण वर्णीय व्यक्ती, महात्मा गांधी, भारतीय वंशाचे ब्रिटिश हेर नूर इनायत खान आणि जमैकन ब्रिटिश नर्स मैरी सीकोल यांच्या योगदाना प्रित्यर्थ, त्यांचे छायाचित्र असलेली नाणी जारी करण्यात येतील.

इग्लंडचे अर्थमंत्री ऋषी सुनक यांनी यासंदर्भात रॉयल मिंट अॅडव्हायजरी कमिटीला (RMAC) एक पत्र लिहिले आहे. यात या समुदायांशी संबंधित लोकांच्या योगदानबद्दल त्यांना सन्माननित करण्यात यावे, अशे सांगण्यात आले आहे. ब्रिटनच्या ट्रेझरीच्या वतीने जारी करण्यात आलेल्या एका निवेदनात, RMAC महात्मा गांधींचे चित्र असलेले एक नाणे जारी करण्यासंदर्भात विचार करत आहे. 

ब्रिटिश नाण्यावर महात्मा गांधी यांच्या छायाचित्रासंदर्भात ऑक्टोबर 2019 मध्ये माजी मंत्री साजिद जाविद यांनी सर्वप्रथ विचार मांडला होता. सुनक यांनी हे पत्र, 'वुई टु बील्ट ब्रिटेन' (आम्हीही ब्रिटन घडवला) कॅम्पेनच्या समर्थनार्थ लिहिले आहे. ज्यात ब्रिटिश चलनावर कृष्णवर्णीय व्यक्तींना प्रतिनिधित्व देण्याची मागणी केली जात आहे.

कॅम्पेनचे नेतृत्व करणाऱ्या जेहरा जाहिदी यांना लिहिलेल्या या पत्रात म्हटले आहे, की ''कॉष्णवर्णीय, आशियन आणि इतर अल्पसंख्यक समाजाने युनायटेड किंगडमच्या इतिहासात मोठे योगदान दिले आहे.'' 

सुनक यांनी पुढे लिहिले आहे, की ''मी आज रॉयल मिंट अॅडव्हायजरी कमिटीच्या प्रमुखांना लिहित आहे आणि त्यांनी यावर विचार करावा असे आवाहन करत आहे.'' सुनक यांच्या कार्यालयाने पुष्टी केली आहे, की कमिटी सध्या महात्मा गांधींवर नाणे आणण्याचा विचार करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या -

'या' 3 सरकारी बँकांचे होणार खासगीकरण? नीती आयोगाचा सरकारला सल्ला

Corona Vaccine: पुण्याच्या सीरम इस्टिट्यूटचा मोठा दावा, सर्वात पहिले अन् सर्वात मोठ्या प्रमाणावर तयार करणार लस

तंबाखूपासून तयार केली कोरोना लस? मानवी चाचणीसाठी मागितली परवानगी...

शुक्रिया मोदी भैया : मुस्लीम महिलांनी पंतप्रधान मोदींच्या फोटोला बांधली राखी, 'या'साठी मानले आभार

100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर

15 ऑगस्ट : सरकारचा मोठा निर्णय, लष्करी अधिकारी समारंभापर्यंत क्वारंटाइन

युवकाच्या 'जीन्स'मध्ये घुसला 'कोब्रा', खांबाला धरून काढावी लागली अख्खी रात्र; मग...

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: mahatma gandhi may appear on britain coins soon  rishi sunak support campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.