पाकिस्तानात एकाच महिन्यात तिसऱ्यांदा वाढले LPGचे भाव, ११ KGचं सिलिंडर किती रुपयांना मिळतंय? जाणून थक्क व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 18:25 IST2026-04-01T18:23:27+5:302026-04-01T18:25:15+5:30
...परिणामी, आधीच आर्थिक दृष्ट्या डबघाईला आलेल्या पाकिस्तानात युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत, तब्बल तिसऱ्यांदा एलपीजीच्या किमतीत ३४ टक्क्यांची भरमसाठ वाढ करण्यात आली आहे.

पाकिस्तानात एकाच महिन्यात तिसऱ्यांदा वाढले LPGचे भाव, ११ KGचं सिलिंडर किती रुपयांना मिळतंय? जाणून थक्क व्हाल
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या सावटाखाली जगातील अनेक देश होरपळून निघत आहेत. संपर्ण जगासमोरच तेल आणि घरगुती गॅसचे (LPG) महा संकट उभे आहे. यात शेजारील देश पाकिस्तानही होरपळला जात आहे. पाकिस्तानात हे संकट प्रचंड वाढले आहे. परिणामी, आधीच आर्थिक दृष्ट्या डबघाईला आलेल्या पाकिस्तानात युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत, तब्बल तिसऱ्यांदा एलपीजीच्या किमतीत ३४ टक्क्यांची भरमसाठ वाढ करण्यात आली आहे.
एका सिलिंडरसाठी ३५८८.५९ रुपये -
पाकिस्तानच्या 'ऑईल अँड गॅस रेग्युलेटरी ऑथोरिटी'ने (OGRA) दिलेल्या माहितीनुसार, ११.८ किलोच्या घरगुती सिलिंडरची किंमत ९२३.७१ रुपयांनी वाढली असून आता पाकिस्तानी नागरिकांना एका सिलिंडरसाठी ३५८८.५९ रुपये मोजावे लागणार आहेत. पाकिस्तान आवश्यकतेच्या ८० ते ८५ टक्के कच्चे तेल सौदी अरेबिया आणि यूएई, कुवेतसारख्या देशांतून आयात करतो. मात्र, इराणने होर्मुज सामुद्रधुनी बंद केल्याने हा पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे.
इंधन बचतीसाठी 'वर्क फ्रॉम होम'चा आदेश -
युद्ध सुरू होताच पाकिस्तानने इंधन बचतीसाठी तातडीने 'वर्क फ्रॉम होम'चा आदेश दिले. ५० टक्के सरकारी कर्मचारी घरून काम करत आहेत. आठवड्यातून केवळ चार दिवसच कार्यालये सुरू आहेत. याशिवाय, शाळाही ऑनलाइन सुरू आहेत.
युद्धात पाकिस्तानची मध्यस्थीची भूमिका -
महत्वाचे म्हणजे, स्वतःचा तेल साठा संपत आल्याने आणि आखाती देशांत काम करणाऱ्या ४५ लाख नागरिकांच्या रोजगारावर गदा येते की काय? अशी भीती वाटू लागल्याने पाकिस्तान आता अमेरिका आणि ईराणमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहे. आगामी काही दिवसांत इस्लामाबादमध्ये या दोन्ही देशांच्या प्रतिनिधींची महत्त्वाची बैठक होऊ शकते.