एकाकीपणामुळे जीवन कंटाळवाणे झाले, वैतागलेल्या तरुणाने फेसबुकवर स्वत:लाच विक्रीला काढले

By बाळकृष्ण परब | Published: October 1, 2020 04:01 PM2020-10-01T16:01:22+5:302020-10-01T16:11:06+5:30

young man sells himself facebook : कोरोनाकाळात लॉकडाऊन, सोशल डिस्टंसिंगमुळे अनेकांचे जीवन कंटाळवाणे बनले. पण याच दरम्यान दहा वर्षांपासून एकाकी असलेल्या एका तरुणाने एकाकीपणाला कंटाळून केलेला एक विचित्र प्रकार समोर आला आहे.

Loneliness makes life boring, annoyed young man sells himself on Facebook | एकाकीपणामुळे जीवन कंटाळवाणे झाले, वैतागलेल्या तरुणाने फेसबुकवर स्वत:लाच विक्रीला काढले

एकाकीपणामुळे जीवन कंटाळवाणे झाले, वैतागलेल्या तरुणाने फेसबुकवर स्वत:लाच विक्रीला काढले

Next
ठळक मुद्देदहा वर्षात एकाही रिलेशनमध्ये राहू न शकल्याने या तरुणाचे जीवन एकाकीपणामुळे कंटाळवाणे बनले होतेआपल्या जीवनातील एकाकीपणाला कंटाळून या तरुणाने चक्क स्वत: लाच विक्रीला काढण्याचा निर्णय घेतलाअ‍ॅलन क्लेटॉन असे या स्वत:लाच विक्रीला काढणाऱ्या तरुणाचे नाव आहे

लंडन - कोरोनाकाळात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा अनेक जोडप्यांना फटका बसला होता. वेगवेगळ्या ठिकाणी अडकल्याने अनेकांना दुरावा सहन करावा लागला होता. दरम्यान, या काळात काही जोडप्यांना मात्र दीर्घकाळ एकत्र राहता आले. काही ठिकाणी बराच वेळ एकत्र राहिल्याने वादविवाद होऊन घटस्फोटाच्या घटनांमध्येही वाढ दिसून आली. लॉकडाऊन, सोशल डिस्टंसिंगमुळे अनेकांचे जीवन कंटाळवाणे बनले. पण याच दरम्यान एका तरुणाने एकाकीपणाला कंटाळून केलेला एक विचित्र प्रकार समोर आला आहे. या तरुणाचा लॉकडाऊन, कोरोनाशी काहीही संबंध नाही आहे.

तर हा ३० वर्षीय तरुण गेल्या १० वर्षांपासून एकाकी जीवन जगत आहे. दहा वर्षात एकाही रिलेशनमध्ये राहू न शकल्याने या तरुणाचे जीवन एकाकीपणामुळे कंटाळवाणे बनले होते. त्यामुळे आपल्या जीवनातील एकाकीपणाला कंटाळून या तरुणाने चक्क स्वत: लाच विक्रीला काढण्याचा निर्णय घेतला. तसेच स्वत:चा फेसबूकवर सेलसुद्धा लावला. सर्वात गमतीदार बाब म्हणजे या तरुणाने या सेलमध्ये स्वत:ची किंमत आणि अटीशर्तींचासुद्धा उल्लेख केला आहे. आता या तरुणाची पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागली असून, लोकांकडून त्याची खिल्ली उडवण्यात येत आहे. मात्र या पोस्टमुळे आपल्या जीवनात पुन्हा चैतन्य येईल असा या तरुणाला विश्वास आहे.

एकाकीपणाला वैतागलेला हा तरुण ऑनलाइन प्रेमाच्या शोधात आहे. दरम्यान, स्वत:चा सेल लावल्यानंतर त्याच्याकडे मुलींच्या ऑफर्सची रांग लागली आहे. आता आपल्या जीवनातील एकाकीपणा संपुष्टात येईल, अशी त्याला आशा आहे. अ‍ॅलन क्लेटॉन असे या स्वत:लाच विक्रीला काढणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तो गेल्या १० वर्षांपासून एकाकी आहे. त्याने अनेक डेटिंग अ‍ॅप वापरले मात्र त्याला कुणी पार्टनर मिळाली नाही. त्यानंतर त्याने स्वत:लाच विक्रीला लावण्याचा निर्णय घेतला. यूकेचा रहिवासी असलेला अ‍ॅलन पेशाने लॉरी ड्रायव्हर आहे. त्याने स्वत:चा फ्री आणि वापरण्यासाठी चांगल्या कंडिशनमध्ये असल्याचा उल्लेख केला आहे.

आपल्या जाहिरातीमध्ये अ‍ॅलन म्हणतो की, महिलांनो मी अ‍ॅलन ३० वर्षांचा आहे. मी एका प्रेमळ महिलेच्या शोधात आहे. जिच्यासोबत मी बोलू शकेन आणि जिच्यासोबत मी काही सोहळ्यांमध्ये जाऊ शकेन. तिथे मी एकटा जाऊ इच्छित नाही.


दरम्यान, स्वत:च्या विक्रीची जाहिरात दिल्यानंतर त्याला चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. त्याच्या पोस्टवर अनेक मुलींनी त्याच्यासोबत डेटवर जाण्यासाठी रिक्वेस्ट केली आहे. अ‍ॅलनच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत यापैकी एका मुलीसोबत तो बाहेर जाऊन आला आहे. आता इतर मुलींसोबत डेटवर जाण्याची इच्छा त्याने व्यक्त केली आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Loneliness makes life boring, annoyed young man sells himself on Facebook

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app