नाकेबंदी हटवा, होर्मुझ खुली करू, इराणची अट; ट्रम्प म्हणाले, आता केवळ तीन दिवस, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 11:01 IST2026-04-28T11:00:54+5:302026-04-28T11:01:20+5:30

अराघची-पुतीन भेट, सहकार्याचे दिले आश्वासन;

Lift the blockade, will open Hormuz, Iran condition; Trump said, now only three days for Iran | नाकेबंदी हटवा, होर्मुझ खुली करू, इराणची अट; ट्रम्प म्हणाले, आता केवळ तीन दिवस, अन्यथा...

नाकेबंदी हटवा, होर्मुझ खुली करू, इराणची अट; ट्रम्प म्हणाले, आता केवळ तीन दिवस, अन्यथा...

तेहरान/मॉस्को : होर्मुझ सामुद्रधुनीवरील तणाव कमी करण्यास इराणने अणुकार्यक्रमावर कोणतीही स्पष्ट हमी न देता ही जलवाहतूक मार्गिका पुन्हा खुली करण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, त्यासाठी अमेरिकेने इराणवरील सागरी नाकेबंदी हटवावी, अशी अट तेहरानने घातल्याचे वृत्त आहे. त्याचवेळी इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी रशियात जाऊन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांची भेट घेतली आहे. या भेटीत पुतीन यांनी इराणला सहकार्य करणार असल्याचा विश्वास दिला आहे. 

या घडामोडींनतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला तीन दिवसांची डेडलाइन दिली असून, तोवर करार न केल्यास त्यानंतर ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला करण्यात येणार असल्याची धमकीही दिली आहे. त्यामुळे आखातातील तणाव कायम असून, युद्ध पुन्हा पेटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याचा परिणाम म्हणून, सोमवारी कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा वाढल्या. कच्च्या तेलाचे दर प्रतिबॅरल ११० डॉलर्सच्या वर गेले आहेत. इंधन आणि खतांच्या तुटवड्यामुळे जगभरातील सुमारे ३ कोटी लोक गरिबीच्या खाईत ढकलले जाण्याची भीती व्यक्त होत आहे. 

इराणबरोबरच्या वाटाघाटी अतिशय संवेदनशील राजनैतिक चर्चा आहेत आणि माध्यमांमार्फत अमेरिका वाटाघाटी करणार नाही,  असे व्हाइट हाउसच्या सहाय्यक प्रेस सचिव ओलिव्हिया वेल्सने म्हटले आहे. अमेरिकेकडे सर्व पर्याय उपलब्ध आहेत आणि अमेरिकन नागरिकांच्या हिताला प्राधान्य देणारा करारच केला जाईल. इराणला कधीही अण्वस्त्र मिळू दिले जाणार नाही, यावर ट्रम्प ठाम असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Web Title : ईरान ने प्रतिबंध हटाने की मांग की, होर्मुज बंद करने की धमकी; ट्रम्प की समय सीमा।

Web Summary : ईरान ने होर्मुज को फिर से खोलने के लिए प्रतिबंधों में राहत मांगी। ट्रम्प ने तीन दिनों के भीतर परमाणु समझौते पर सहमति न होने पर कार्रवाई की धमकी दी। बढ़ते तेल की कीमतों और संभावित वैश्विक गरीबी से तनाव बढ़ रहा है।

Web Title : Iran demands sanctions removal, threatens Hormuz closure; Trump sets deadline.

Web Summary : Iran seeks sanctions relief for Hormuz reopening. Trump threatens action within three days if no nuclear deal is reached. Rising oil prices and potential global poverty increases tensions.