'गजवा-ए-हिंद'साठी पाक फौजा तयार, लष्कर ए तैयबाने पुन्हा भारताविरोधात ओकली गरळ, थेट मोदींना धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 18:18 IST2026-01-06T18:16:20+5:302026-01-06T18:18:06+5:30
शेकडो दहशतवाद्यांच्या उपस्थितीत एका जनसभेत बोलताना सैफुल्ला सैफने त्याची मर्यादा ओलांडली.

'गजवा-ए-हिंद'साठी पाक फौजा तयार, लष्कर ए तैयबाने पुन्हा भारताविरोधात ओकली गरळ, थेट मोदींना धमकी
पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना लष्कर ए तैयबाने पुन्हा एकदा भारताविरोधात गरळ ओकली आहे. लष्करचा बहावलपूर चीफ सैफुल्ला सैफने खुल्या व्यासपीठावरून भारताला धमकी देत गजवा-ए-हिंद करण्याचं आव्हान दिले आहे. या दहशतवाद्याने ना केवळ भारतीय नेत्यांविरोधात हिंसक भाषेचा वापर केला आहे तर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टार्गेट करण्याचीही पोकळ धमकी दिली आहे.
शेकडो दहशतवाद्यांच्या उपस्थितीत एका जनसभेत बोलताना सैफुल्ला सैफने त्याची मर्यादा ओलांडली. त्याने चिथावणी देत म्हणाला की, आता भारताविरोधात जिहाद करण्याची वेळ आली आहे. भारतीय नेते काफीर असून त्याने त्यांच्या हत्येची धमकी दिली. आता प्रादेशिक समीकरणे बदलली आहेत. बांगलादेशही पाकिस्तानसोबत उभा आहे. त्यामुळे भारताविरोधात गजवा ए हिंदचा नारा बुलंद करण्यासाठी पाकिस्तानी फौजही तयार आहे. लष्करच्या या कमांडरने दहशतवाद्यांना उकसावत भारताविरोधात मोठ्या हल्ल्याची तयारी करण्याची भाषा वापरली.
सुरक्षा यंत्रणा अलर्ट
लष्कर ए तैयबाचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर भारतीय सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. याप्रकारे खुल्या व्यासपीठावरून दिलेली धमकी म्हणजे पाकिस्तानचे नैराश्य समोर येते, जिथे जागतिक स्तरावर पाकिस्तानचा खरा चेहरा भारताने उघड केला त्यामुळे पाक बिथरला आहे. पाकिस्तानच्या जमिनीचा वापर उघडपणे दहशतवाद्याला चालना देण्यासाठी वापरले जातेय हे जगासमोर उघड झाले. ज्या दहशतवादी संघटनांवर बंदी आणल्याचा दावा पाकिस्तान करते त्यांचा हा दावा जगासमोर खोटा ठरला आहे.
दरम्यान, हाफीज सईदचा निकटवर्तीय लष्करचा डिप्टी चीफ सैफुल्लाह कसूरी यानेही मागील डिसेंबर महिन्यात हजारो समर्थकांसमोर भारताविरोधात भाष्य केले होते. ऑपरेशन सिंदूर करून भारताने चूक केली असं त्याने म्हटले. संपूर्ण जगाची सिस्टम बदलू शकते, परंतु लष्कर ए तैयबा काश्मीर मिशनपासून मागे हटणार नाही. आम्हाला दहशतवादी बोलणाऱ्यांनो, आम्ही काश्मीर आणि पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्याच्या आमच्या मोहिमेपासून आम्ही कधीही मागे हटणार नाही असं विधान केले होते.