इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 14:52 IST2026-04-05T14:50:53+5:302026-04-05T14:52:11+5:30

Middle East War Update: कुवेतमध्ये ऑईल कॉम्प्लेक्स आणि वीज प्रकल्पांना ड्रोननी लक्ष्य केले आहे. कुवेत पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या मुख्यालयात आग लागली असून बहरीनमध्येही हल्ले झाले आहेत.

Kuwait Oil Complex drone attack 2026: This Arab country is suffering more than Iran; electricity, water and oil depots, even government buildings are destroyed... | इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...

इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...

मध्य-पूर्वेतील युद्धाची झळ इराणवर हल्ले झाल्याने त्यांचे नुकसान झाले आहेच, परंतू कुवेतला मोठ्या प्रमाणावर बसू लागली आहे. रविवारी पहाटे कुवेतच्या शुवैख परिसरात असलेल्या 'कुवेत पेट्रोलियम कॉर्पोरेशन'च्या मुख्य ऑईल कॉम्प्लेक्सवर भीषण ड्रोन हल्ला झाला. या हल्ल्यामुळे संपूर्ण परिसरात आगीचे लोट पसरले असून, तेल मंत्रालय आणि कंपनीचे मुख्यालय असलेल्या या इमारती तातडीने रिकाम्या करण्यात आल्या आहेत.

केवळ तेल क्षेत्रच नव्हे, तर ड्रोननी कुवेतच्या सरकारी मंत्रालयांच्या ऑफिस कॉम्प्लेक्सलाही लक्ष्य केले आहे. या हल्ल्यात इमारतींचे प्रचंड नुकसान झाले असून प्रशासकीय कामकाज विस्कळीत झाले आहे. सुदैवाने, या दोन्ही हल्ल्यांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही, परंतु मालमत्तेचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.

वीज आणि पाणी पुरवठा प्रकल्पांवर 'ब्लॅकआऊट'चे सावट
कुवेतच्या वीज आणि जल मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, दोन मोठ्या पॉवर आणि वॉटर डीसॅलिनेशन प्लांट्सवर ड्रोन हल्ला झाला. या हल्ल्यामुळे वीज निर्मितीचे दोन संच बंद करावे लागले आहेत. देशातील वीज आणि पाणी पुरवठा खंडित होऊ नये म्हणून सरकारने तातडीने 'इमर्जन्सी प्लॅन' लागू केला आहे.

बहरीनमध्येही आगीचा तांडव
कुवेतसोबतच शेजारील बहरीन देशातही एका स्टोरेज फॅसिलिटीवर हल्ला झाला असून तिथे मोठी आग लागली होती. तासाभराच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली असली तरी, संपूर्ण आखाती देशांमधील ऊर्जा साखळीवर आता युद्धाचे सावट गडद झाले आहे.

जागतिक तेल बाजारपेठेवर परिणाम
कुवेत हा 'ओपेक' मधील एक मोठा तेल उत्पादक देश असून तो दररोज २.६ मिलियन बॅरल तेलाचे उत्पादन करतो. मीना अल-अहमदी आणि मीना अब्दुल्ला यांसारख्या प्रमुख रिफायनरींवर वारंवार होणाऱ्या या हल्ल्यांमुळे जागतिक तेल पुरवठा साखळी धोक्यात आली आहे. जर हे हल्ले थांबले नाहीत, तर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Web Title : ईरान से ज़्यादा यह अरब देश त्रस्त; हमले से बुनियादी ढाँचा पंगु

Web Summary : कुवैत तेल सुविधाओं, सरकारी इमारतों और बिजली संयंत्रों पर ड्रोन हमलों के कारण गंभीर बुनियादी ढांचे के नुकसान का सामना कर रहा है। ब्लैकआउट के बीच आपातकालीन योजनाएँ सक्रिय की गईं। बहरीन में भी आग लगने की सूचना है। प्रमुख रिफाइनरियों को निशाना बनाने से वैश्विक तेल बाजार में व्यवधान मंडरा रहा है।

Web Title : Arab Nation Suffers More Than Iran: Attacks Cripple Infrastructure

Web Summary : Kuwait faces severe infrastructure damage due to drone attacks on oil facilities, government buildings, and power plants. Emergency plans are activated amid blackouts. Bahrain also reports fires. Global oil market disruption looms as key refineries are targeted.