कुवेतच्या एका चुकीमुळे अमेरिकेची तीन लढाऊ विमाने कोसळली; फ्रेंडली फायरमध्ये ६ वैमानिक थोडक्यात बचावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 18:05 IST2026-03-04T18:02:42+5:302026-03-04T18:05:28+5:30

कुवेतच्या एका चुकीच्या सिग्नलमुळे अमेरिकन हवाई दलाचे कोट्यवधींचे नुकसान

Kuwait Accidentally Shoots Down 3 US F 15 Fighter Jets All 6 Crew Members Safe | कुवेतच्या एका चुकीमुळे अमेरिकेची तीन लढाऊ विमाने कोसळली; फ्रेंडली फायरमध्ये ६ वैमानिक थोडक्यात बचावले

कुवेतच्या एका चुकीमुळे अमेरिकेची तीन लढाऊ विमाने कोसळली; फ्रेंडली फायरमध्ये ६ वैमानिक थोडक्यात बचावले

Kuwait Hit US Fighter Jet: मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. कुवेतच्या हवाई संरक्षण दलाने चुकून अमेरिकेची तीन एफ-१५ ई स्ट्राईक ईगल लढाऊ विमाने पाडली आहेत. या घटनेला अमेरिकन लष्कराने दुजोरा दिला असून, याला तांत्रिक भाषेत फ्रेंडली फायर असे म्हटले जात आहे.

इराणचा दावा ठरला खोटा

या घटनेनंतर सुरुवातीला इराणने असा दावा केला होता की, त्यांनी अमेरिकेची लढाऊ विमाने पाडली आहेत. एका व्हायरल व्हिडिओमध्ये विमान आगीच्या गोळ्यासारखे खाली पडताना आणि वैमानिक पॅराशूटच्या साहाय्याने उतरताना दिसले होते. मात्र, अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने स्पष्ट केले की, हा हल्ला शत्रूने नव्हे, तर मित्र देश कुवेतच्या चुकीमुळे झाला आहे.

नेमकं काय घडलं?

माध्यमांच्या वृत्तानुसार, सोमवारी कुवेतच्या आकाशात गस्त घालत असताना कुवेतच्या एका F-18 हॉर्नेट विमानाने अनावधानाने तीन क्षेपणास्त्रे डागली. ही क्षेपणास्त्रे थेट अमेरिकन विमानांना लागली आणि तीनही विमाने कोसळली. ज्यावेळी ही घटना घडली, तेव्हा अमेरिकन विमाने इराणकडून येणारी क्षेपणास्त्रे आणि ड्रोन रोखण्यासाठी एपिक फ्युरी मोहिमेवर होती. युद्धजन्य परिस्थितीत कुवेतच्या हवाई संरक्षण यंत्रणेने या विमानांना शत्रूचे विमान समजून चुकून लक्ष्य केले.

६ वैमानिक सुखरूप; बचावकार्य यशस्वी

सुदैवाने, तीनही विमानांमधील एकूण सहा वैमानिकांनी वेळीच इजेक्ट केले आणि पॅराशूटच्या मदतीने ते जमिनीवर उतरले. कुवेतच्या संरक्षण मंत्रालयाने तातडीने शोध आणि बचाव मोहीम राबवून सर्व वैमानिकांना बाहेर काढले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कुवेत आणि अमेरिकेचे स्पष्टीकरण

अमेरिकन सेंट्रल कमांडने आपल्या निवेदनात म्हटले की, "आम्ही कुवेतच्या संरक्षण दलाने केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभारी आहोत. ही एक दुर्दैवी चूक होती." दुसरीकडे, कुवेतच्या संरक्षण मंत्रालयाने या अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. अमेरिकन सैन्याशी पूर्ण ताळमेळ राखून ही तपासणी केली जात आहे.
 

Web Title : कुवैत की चूक: अमेरिकी लड़ाकू विमान दुर्घटनाग्रस्त; पायलट सुरक्षित

Web Summary : ईरान के मिसाइलों के खिलाफ एक मिशन के दौरान कुवैत ने गलती से तीन अमेरिकी एफ-15 लड़ाकू विमानों को मार गिराया। सभी छह पायलट सुरक्षित रूप से बाहर निकल गए। अमेरिका ने दोस्ताना आग की घटना को स्वीकार किया, और कुवैत ने दुर्भाग्यपूर्ण त्रुटि की उच्च स्तरीय जांच शुरू की है।

Web Title : Kuwait's Mistake: US Fighter Jets Downed; Pilots Survive Friendly Fire

Web Summary : Kuwait mistakenly downed three US F-15 fighter jets during a mission against Iranian missiles. All six pilots ejected safely. The US acknowledged the friendly fire incident, and Kuwait has initiated a high-level investigation into the unfortunate error.