शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

चीन मैत्रीला जागला! उत्तर कोरियाचा हुकूमशहा कीम जोंग उनला पाठवली कोरोनाची लस

By मोरेश्वर येरम | Published: December 01, 2020 12:35 PM

चीनमध्ये सुरू असलेल्या लशींच्या निर्मितीपैकी एक लस उत्तर कोरियाच्या हुकूमशहासाठी पाठवून देण्यात आली आहे.

ठळक मुद्देकिम जोंग यांच्यासह बड्या अधिकाऱ्यांना दिली कोरोनाची लसचीनमध्ये सध्या तीन लशीची सुरू आहे चाचणीउत्तर कोरियात कोरोना नसल्याचा दावा दक्षिण कोरियाने फेटाळला

प्योंगयांगचीननेउत्तर कोरियासोबतच्या मैत्रीला जागत हुकूमशहा किम जोंग उन आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांसाठी कोरोना लशीचे डोस पाठवून दिले आहेत, असा दावा अमेरिकेतील अभ्यासकांनी जपानी गुप्तहेरांच्या सहाय्याने केला आहे. चीनमध्ये अंतिम टप्प्यात या लशीची चाचणी सुरू आहे. किम जोंग उन यांच्यासोबतच उत्तर कोरियाच्या अनेक बड्या अधिकाऱ्यांना या लशीचे डोस देण्यात आल्याचा दावा सेंटर फॉर दी नॅशनल इंट्रेस्टचे अधिकारी हॅरी काजियानिस यांनी केला आहे. 

हॅरी यांच्या म्हणण्यानुसार, "चीनमध्ये सुरू असलेल्या लशींच्या निर्मितीपैकी एक लस उत्तर कोरियाच्या हुकूमशहासाठी पाठवून देण्यात आली आहे. नेमकी कोणती लस पाठविण्यात आली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. यासोबतच या लशीच्या सुरक्षिततेबाबतही काही कळू शकलेलं नाही. किम जोंग उन आणि त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना गेल्या दोन-तीन आठवड्यांपू्र्वी चीन सरकारची लस देण्यात आली आहे." 

तीन कंपन्यांकडून लशीची निर्मितीचीनमध्ये सध्या तीन कंपन्या कोरोनावरील लशीची निर्मिती करत असल्याची माहिती अमेरिकेचे शास्त्रज्ञ पीटर जे होटेज यांनी दिली. यात Sinovac Biotech Ltd, CanSinoBio आणि Sinopharm या कंपन्यांचा समावेश आहे. Sinopharm कंपनीने त्यांच्या लशीचा चीनमध्ये १० लाख लोकांनी वापर केल्याचा दावा केला आहे. दरम्यान, या तिन्ही कंपन्यांपैकी एकाही कंपनीने आपल्या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचाणीचा अहवाल अद्याप प्रसिद्ध केलेला नाही. 

उत्तर कोरियाने अद्याप देशात एकाही कोरोना रुग्णाची माहिती दिलेली नाही. पण उत्तर कोरियात कोरोनाचा फैलाव झालेला नाही, हे वृत्त दक्षिण कोरियाच्या गुप्तहेर खात्याने फेटाळून लावले आहे. उत्तर कोरिया आणि चीन यांचे मोठ्या प्रमाणात व्यापारी संबंध आहेत. याच काळात कोरोनाचा प्रसार सुरू झाला होता असं म्हटलं जात आहे. 

टॅग्स :Kim Jong Unकिम जोंग उनchinaचीनcorona virusकोरोना वायरस बातम्याnorth koreaउत्तर कोरिया