निष्पाप महिला, मुले, क्रिकेटपटूंची हत्या; भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानला सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 12:55 IST2025-12-11T12:54:56+5:302025-12-11T12:55:46+5:30
भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये अफगाणिस्तानवर करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यांवरून तीव्र नाराजी व्यक्त केली. पाकिस्तानचा उल्लेख न करता भारताने दहशतवादी कृत्यांना समर्थन देणाऱ्या देशाचा समाचार घेतला.

निष्पाप महिला, मुले, क्रिकेटपटूंची हत्या; भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानला सुनावले
अफगाणिस्तानात पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यांचा भारताने तीव्र शब्दात निषेध केला. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत बोलताना भारतानेअफगाणिस्तानातील तालिबान सरकारसोबत राजनैतिक संबंध प्रस्थापित केले पाहिजे. तालिबान फक्त शिक्षा देण्याचीच भूमिका घेतली गेली, तर अफगाणिस्तानमध्ये काहीही बदलणार नाही, असे भारताने म्हटले आहे.
१० डिसेंबर रोजी अफगाणिस्तानातील परिस्थितीवर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक झाली. या बैठकीत भारताचे संयुक्त राष्ट्र संघातील भारताचे स्थायी प्रतिनिधी पार्वथनेनी हरीश यांनी भूमिका मांडली.
भारताचे प्रतिनिधी म्हणाले...
अफगाणिस्तानातील लोकांच्या विकासासाठी आवश्यक गोष्टी पूर्ण करण्यासाठी भारत कटिबद्ध आहे, असे हरीश म्हणाले. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यांचा भारताने निषेध केला. या हल्ल्यात निष्पाण महिला, मुले आणि क्रिकेटपटूंची हत्या केली गेली, ही चिंतेचीच बाब असल्याचे भारताने म्हटले आहे.
पाकिस्तानचा उल्लेख न करता भारताने म्हटले की, अफगाणिस्तानसोबतचा व्यापार आणि सीमा पूर्णपणे करणे चुकीचे आहे.
पार्वथनेनी हरीश म्हणाले, 'आम्ही व्यापार आणि स्थलांतरित दहशतवादावरही आम्ही गंभीरपणे पाहत आहोत. यामुळे अफगाणिस्तानातील लोकांना त्यांच्या शेजारी असलेल्या देशात जाण्यासाठी त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तेथील लोक अनेक वर्षांपासून कठीण परिस्थितीचा सामना करत आहेत. हे काम जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचे उल्लंघन आहे.'
'अफगाणिस्तान एक नाजूक आणि कमकुवत स्थितीत असलेला देश आहे जो सध्या कठीण परिस्थितीतून पुन्हा उभा राहण्याचे प्रयत्न करत आहे. त्याला उघडपणे युद्धाच्या धमक्या आणि कारवाई यूएन चार्टर आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे गंभीर उल्लंघन आहे', असे हरीश यांनी म्हटले आहे.
"आंतरराष्ट्रीय समुदायाने याकडे लक्ष दिले पाहिजे की, युएन सुरक्षा परिषदेकडून जाहीर करण्यात आलेल्या दहशतवादी संघटना आणि दहशतवादी आता सीमेपलिकडच्या दहशतवादी कृत्यांमध्ये सामील होणार नाही", असेही ते म्हणाले.