Khawaja Muhammed Asif:पाकिस्तानी संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफने कतारवरील हल्ल्यांसाठी भारताचा मित्र राष्ट्र इस्रायलवर निशाणा साधला. यासोबतच, जगातील इतर मुस्लिम देशांनाही इस्रायलविरुद्ध भडकावले. ख्वाजा आसिफने गुरुवारी (११ सप्टेंबर २०२५) मुस्लिम देशांना त्यांची आर्थिक शक्ती इस्रायलविरुद्ध वापरण्याचे आवाहन केले. तसेच, कतारला कोणत्याही प्रकारची उदारता दाखवणे हे पूर्णपणे चुकीचे असल्याचेही म्हटले.
ख्वाजा आसिफने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट पोस्ट केली. पोस्टमध्ये म्हटले, मुस्लिम देशांनी इस्रायलविरुद्ध एकत्र येण्याची वेळ आली आहे. ज्यांचे मुख्य उद्दिष्ट संपूर्ण मुस्लिम जगाला लक्ष्य करणे आहे, त्यांच्याकडे असलेल्या कोणत्याही आर्थिक शक्तीला निष्प्रभ करणे आहे आणि इस्रायलसाठी मऊ भूमिका घेतल्याने तुम्ही सुरक्षित राहाल असे वाटणे, हा केवळ मूर्खपणा असेल.
भारताबद्दल काय म्हणाले?इस्रायलवर टीका करताना पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी भारताविरुद्ध विष ओकले. मे महिन्यात भारत-पाक संघर्षात मिळालेल्या यशावर आसिफने भर दिला. आसिफ म्हणाले, पाकिस्तानला आपल्या मजबूत सरकार आणि लष्करी सामर्थ्यामुळे स्वतःपेक्षा (भारत) पाचपट मोठ्या देशाचा सामना करता आला. आर्थिकदृष्ट्या कमकुवत देश असूनही, मजबूत सरकार आणि शक्तिशाली सशस्त्र दलामुळे हे शक्य झाले, अशी मुक्ताफळे ख्वाजा आसिफने उधळली.