५० लढाऊ विमानांसह खामेनेईंचा लष्करी बंकर केला नष्ट, इस्राइलने समोर आणला व्हिडीओ   

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 19:00 IST2026-03-06T18:59:55+5:302026-03-06T19:00:10+5:30

Iran War News: इस्राइलची डिफेन्स फोर्स असलेल्या आयडीएफने इराणचे सर्वोच्च नेचे अयातुल्लाह अली खामेनेई यांच्या बंकरवर केलेल्या हल्ल्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.  

Khamenei's military bunker destroyed with 50 fighter jets, Israel releases video | ५० लढाऊ विमानांसह खामेनेईंचा लष्करी बंकर केला नष्ट, इस्राइलने समोर आणला व्हिडीओ   

५० लढाऊ विमानांसह खामेनेईंचा लष्करी बंकर केला नष्ट, इस्राइलने समोर आणला व्हिडीओ   

अमेरिका आणि इस्राइल यांनी इराणविरोधात सुरू केलेलं युद्ध आज सातव्या दिवशी अधिकच तीव्र झालं आहे. दोन्हीकडून एकमेकांवर रॉकेट, क्षेपणास्त्रे आणि ड्रोनच्या माध्यमातून हल्ले सुरू आहेत. दरम्यान, इस्राइलची डिफेन्स फोर्स असलेल्या आयडीएफने इराणचे सर्वोच्च नेचे अयातुल्लाह अली खामेनेई यांच्या बंकरवर केलेल्या हल्ल्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

इस्राइलच्या हवाई दलाच्या सुमारे ५० लढाऊ विमनांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांच्या निवास्थानाखाली असलेल्या भूमिगत बंकरला लक्ष्य केले होते, असा दावा या व्हिडीओच्या माध्यमातून आयडीएफने केला आहे.

हा बंकर इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्लाह खामेनेई यांच्याशी संबंधित होता, असे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा हल्ला तेहरानमधील संबंधित परिसराखाली इराणी सरकारच्या वरिष्ठ नेतृत्वाचे लष्करी तळ असल्याची माहिती मिळाल्यानंतर करण्यात आला. इराणच्या सैनिकी शक्तीला कमकुवत करणे हा होता, असे इस्राइलने सांगितले आहे. मात्र या हल्ल्यात झालेली हानी आणि इतर नुकसानीबाबत अधिकृतरीत्या कुठलीही माहिती समोर आलेली नाही.  

Web Title : इज़राइल का दावा: 50 लड़ाकू विमानों से खामेनेई का बंकर नष्ट।

Web Summary : इज़राइल का दावा है कि उसकी वायु सेना ने तेहरान में ईरानी सर्वोच्च नेता खामेनेई के भूमिगत सैन्य बंकर को 50 लड़ाकू विमानों से नष्ट कर दिया। हमले का उद्देश्य ईरान की सैन्य शक्ति को कमजोर करना था। नुकसान का विवरण अभी तक अपुष्ट है।

Web Title : Israel claims destruction of Khamenei's bunker with 50 fighter jets.

Web Summary : Israel claims its air force destroyed Iranian Supreme Leader Khamenei's underground military bunker in Tehran using 50 fighter jets. The attack aimed to weaken Iran's military strength. Details on damages remain unconfirmed.