खामेनींचा गेम ओव्हर? इराणमध्ये सत्तापालटासाठी पेंटागनचा 'मास्टर प्लॅन' तयार; ट्रम्प घेणार मोठा निर्णय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 15:18 IST2026-01-21T15:13:09+5:302026-01-21T15:18:16+5:30

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांची सत्ता उलथवून लावण्यासाठी अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय 'पेंटागन'ने एक निर्णायक आणि अत्यंत गुप्त प्लॅन तयार केला आहे.

Khamenei's game over? Pentagon's 'master plan' ready for coup in Iran; Trump to take big decision! | खामेनींचा गेम ओव्हर? इराणमध्ये सत्तापालटासाठी पेंटागनचा 'मास्टर प्लॅन' तयार; ट्रम्प घेणार मोठा निर्णय!

खामेनींचा गेम ओव्हर? इराणमध्ये सत्तापालटासाठी पेंटागनचा 'मास्टर प्लॅन' तयार; ट्रम्प घेणार मोठा निर्णय!

मध्यपूर्वेतील कट्टर शत्रू असलेल्या इराणला धडा शिकवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कंबर कसली आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांची सत्ता उलथवून लावण्यासाठी अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय 'पेंटागन'ने एक निर्णायक आणि अत्यंत गुप्त प्लॅन तयार केला आहे. १४ जानेवारी रोजी झालेल्या हायलेव्हल मीटिंगमध्ये ट्रम्प यांनी दिलेल्या आदेशानंतर, आता हा तख्तापलटाचा आराखडा लवकरच व्हाईट हाऊसमध्ये सादर केला जाणार आहे.

काय आहे पेंटागनचा हा 'मास्टर प्लॅन'? 

'वॉल स्ट्रीट जनरल'ने दिलेल्या वृत्तानुसार, इराणमध्ये सध्या शांतता असली तरी अमेरिका मोठ्या कारवाईच्या तयारीत आहे. या प्लॅनमध्ये इराणची सर्वात मोठी ताकद समजल्या जाणाऱ्या 'रिव्होल्यूशनरी गार्ड'ला लक्ष्य करण्यात आले आहे. सुमारे १.५ लाख सक्रिय सदस्य असलेल्या या दलाच्या मुख्य तळांवर हवाई आणि जमिनीवरून हल्ले करण्याची योजना आखण्यात आली आहे. रिव्होल्यूशनरी गार्डला कमकुवत केल्याशिवाय इराणमधील इस्लामिक राजवट संपवणे अशक्य असल्याचे अमेरिकेचे मत आहे.

खामेनी 'अंडरग्राउंड', इराणमध्ये अस्वस्थता 

एकीकडे अमेरिकेने कारवाईची तयारी सुरू केली असतानाच, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी हे १७ जानेवारीपासून बेपत्ता असून ते अंडरग्राउंड झाल्याचे वृत्त आहे. बीबीसी फारसीने दिलेल्या माहितीनुसार, खामेनी सार्वजनिक जीवनापासून दूर गेल्यामुळे इराणमध्ये सत्तेच्या संघर्षाची चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी जून २०२५ मध्येही त्यांना अशाच प्रकारे सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते.

अमेरिका इराणच्या मागे का हात धुऊन लागली आहे? 

इराण हा जगातील तेल आणि नैसर्गिक वायूचा मोठा साठा असलेला देश आहे. तसेच जागतिक व्यापारासाठी महत्त्वाच्या असलेल्या 'होर्मुझ सामुद्रधुनी'वर इराणचे वर्चस्व आहे, जिथून जगातील २० टक्के तेल व्यापार होतो. १९७९ पासून अमेरिकेचे इराणवरील नियंत्रण पूर्णपणे संपले आहे, जे पुन्हा मिळवण्यासाठी अमेरिका प्रयत्नशील आहे. याशिवाय, खामेनी हे अमेरिकेचे कट्टर विरोधक असून ते हिजबुल्लाह, हमास आणि हूती यांसारख्या संघटनांना पाठबळ देत असल्याचा अमेरिकेचा आरोप आहे.

तख्तापलट करणं आव्हानात्मक! 

इराणची शासन व्यवस्था अत्यंत गुंतागुंतीची आहे. एका बाजूला खामेनी यांच्याकडे सैन्य आणि न्यायपालिकेचे सर्व अधिकार आहेत, तर दुसरीकडे निवडून आलेले राष्ट्राध्यक्ष आर्थिक धोरणे पाहतात. त्यामुळे केवळ खामेनींना बाजूला करून तख्तापलट करणे अमेरिकेसाठी सोपे नसणार आहे. इराणची संसद आणि मंत्रिमंडळ या संपूर्ण व्यवस्थेला खिळखिळे करण्याचे मोठे आव्हान पेंटागनसमोर असणार आहे. ट्रम्प या प्लॅनला हिरवा कंदील देतात का, याकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

Web Title : खमेनी का अंत? ईरान में सत्ता परिवर्तन के लिए पेंटागन की 'मास्टर प्लान' तैयार!

Web Summary : अमेरिका ईरान के खमेनी को हटाने पर विचार कर रहा है। पेंटागन ने रिवोल्यूशनरी गार्ड को लक्षित करते हुए एक योजना बनाई है, जिसका उद्देश्य शासन को कमजोर करना है। खमेनी के गायब होने से अशांति बढ़ रही है। अमेरिका ईरानी तेल और व्यापार मार्गों पर फिर से प्रभाव चाहता है।

Web Title : Khamenei's End? Pentagon's 'Master Plan' for Iran Regime Change Ready!

Web Summary : US considers ousting Iran's Khamenei. Pentagon devised a plan targeting Revolutionary Guard, aiming to weaken the regime. Khamenei's disappearance fuels unrest. US seeks renewed influence over Iranian oil and trade routes.