खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 20:54 IST2025-06-23T20:54:25+5:302025-06-23T20:54:47+5:30

रेझा शाह पहलवी यांनी आरोप केला आहे की, खामेनेई आणि त्यांचे जवळचे लोक इराणमधून पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत.

Khamenei preparing to flee! Iran's former crown prince claims, what did he say about the 'Supreme Leader'? | खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?

खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?

अमेरिका असो वा इस्रायल, दोन्ही देशांच्या निशाण्यावर सध्या इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खामेनेई आहेत. १३ जून रोजी सकाळी इस्रायलनेइराणविरुद्ध लष्करी कारवाई सुरू केल्यापासून अयातुल्लाह खामेनेई एका सुरक्षित ठिकाणी लपून बसले आहेत. काही दिवसांपूर्वी असा दावा करण्यात आला होता की, खामेनेई आणि त्यांचे कुटुंब एका बंकरमध्ये लपून बसले आहेत. त्याच वेळी, इस्रायलचे संरक्षण मंत्री याओव गॅलंट यांनी म्हटले होते की, खामेनेई यांचा खात्मा झाल्यावरच 'ऑपरेशन रायझिंग लायन' यशस्वी मानले जाईल.

खामेनेई इराणमधून पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत: रेझा शाह पहलवी
इराणचे निर्वासित 'क्राउन प्रिन्स' रेझा शाह पहलवी यांनीही खामेनेई यांच्याविरोधात जोरदार हल्लाबोल केला आहे. रेझा शाह पहलवी यांनी आरोप केला आहे की, खामेनेई आणि त्यांचे जवळचे लोक इराणमधून पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. "माझा खामेनेईंना एक थेट संदेश आहे: पद सोडा. जर तुम्ही असे केले, तर तुम्हाला योग्य सुनावणी आणि कायद्याची योग्य प्रक्रिया मिळेल," असे पहलवी यांनी म्हटले आहे.

'मला सत्तेचा लोभ नाही' : प्रिन्स रेझा शाह पहलवी
प्रिन्स रेझा शाह पहलवी यांनी म्हटले आहे की, त्यांना इराणच्या सत्तेचा लोभ नाही. शाह पहलवी म्हणाले, "मला राजकीय सत्ता नको आहे, तर आपल्या महान राष्ट्राला स्थिरता, स्वातंत्र्य आणि न्यायाच्या दिशेने या महत्त्वाच्या वेळी पुढे जाण्यास मदत करायची आहे."

पहलवी यांनी अमेरिका आणि इस्रायलला आवाहन केले आहे की, त्यांनी इराणच्या सध्याच्या शासनाला जीवनदान देऊ नये. इराणमध्ये शांततापूर्ण आणि लोकशाही सरकारला पाठिंबा द्यावा, असे त्यांनी म्हटले आहे. केवळ लोकशाही संक्रमणच इराणला अण्वस्त्रे मिळवण्यापासून रोखू शकते आणि प्रादेशिक स्थिरता सुनिश्चित करू शकते, असेही त्यांनी अधोरेखित केले.

Web Title: Khamenei preparing to flee! Iran's former crown prince claims, what did he say about the 'Supreme Leader'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.