‘इमर्जन्सी’ला खलिस्तानवाद्यांची धमकी; कठोर कारवाई करा : भारताची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 06:34 IST2025-01-25T06:33:23+5:302025-01-25T06:34:29+5:30
Emergency: लंडनमध्ये कंगना रनौतच्या ‘इमर्जन्सी’ला चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान बुरखाधारी खलिस्तानवादी दहशतवाद्यांनी धमकी दिल्याप्रकरणी गृहमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी ब्रिटनमधील विरोधी पक्ष असलेल्या कन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे खासदार बॉब ब्लॅकमन यांनी केली आहे.

‘इमर्जन्सी’ला खलिस्तानवाद्यांची धमकी; कठोर कारवाई करा : भारताची मागणी
लंडन/नवी दिल्ली - लंडनमध्ये कंगना रनौतच्या ‘इमर्जन्सी’ला चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान बुरखाधारी खलिस्तानवादी दहशतवाद्यांनी धमकी दिल्याप्रकरणी गृहमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी ब्रिटनमधील विरोधी पक्ष असलेल्या कन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे खासदार बॉब ब्लॅकमन यांनी केली आहे.
ब्लॅकमन म्हणाले की, बर्मिंघम, मँचेस्टरसह चार शहरात चित्रपटाच्या प्रदर्शनात धमकी देत अडथळे आणले. त्यामुळे ब्रिटनमधील अनेक चित्रपटगृहांतून या चित्रपटाचे प्रदर्शन बंद करण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)
प्रेक्षकांना ‘तो’ अधिकार
‘इमर्जन्सी’ चित्रपट सुरू झाल्यावर सुमारे अर्धा तासाने काही बुरखाधारी खलिस्तानी दहशतवादी चित्रपटगृहात घुसले आणि त्यांनी प्रेक्षकांना धमकावत शो बंद पाडला. ‘हा चित्रपट वादग्रस्त असला तरी याविषयी मी भाष्य करणार नाही. आणीबाणीच्या काळातील संदर्भांचे चित्रीकरण यात आहे.
प्रेक्षकांना ‘इमर्जन्सी’ चित्रपट पाहून निर्णय घ्यायचा अधिकार आहे. त्यामुळे सरकारने यात हस्तक्षेप केला पाहिजे’, असे ब्लॅकमन संसदेत बोलताना म्हणाले.