Corona Vaccine : जॉन्सन अँड जॉन्सनच्या कोरोना लसीमुळे अर्धांगवायूचा धोका, FDA कडून इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 09:40 AM2021-07-13T09:40:16+5:302021-07-13T10:00:06+5:30

Corona Vaccine : कंपनीची लस घेणाऱ्या लोकांमध्ये गुलियन बेरी सिंड्रोमची 100 संशयित प्रकरणे अधिकाऱ्यांना आढळली आहेत.

johnson and johnson vaccine increases risk of rare nerve syndrome, fda warns | Corona Vaccine : जॉन्सन अँड जॉन्सनच्या कोरोना लसीमुळे अर्धांगवायूचा धोका, FDA कडून इशारा

Corona Vaccine : जॉन्सन अँड जॉन्सनच्या कोरोना लसीमुळे अर्धांगवायूचा धोका, FDA कडून इशारा

Next

वॉशिंग्टन : अमेरिकेत जॉन्सन अँड जॉन्सनने विकसित केलेल्या कोरोना लसीसंदर्भात फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने (FDA)  गंभीर इशारा दिला आहे. या लसीमुळे दुर्मीळ न्यूरोलॉजिक स्थिती गुलियन बेरी सिंड्रोमचा (Guillain–Barré syndrome) धोका वाढण्याची शक्यता असल्याचे एफडीएने म्हटले आहे. एफडीएच्या या इशाऱ्यानंतर जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या या कोरोना लसीवर प्रश्नचिन्ह उद्भवण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी ही लस घेतल्यानंतर रक्त गोठल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत. (johnson and johnson vaccine increases risk of rare nerve syndrome, fda warns)

न्यूयॉर्क टाईम्सच्या रिपोर्टमध्ये तज्ज्ञांच्या हवाल्याने असे सांगण्यात आले आहे की, अशी स्थिती विकसित होण्याची शक्यता कमी आहे, असे नियामकांना आढळले आहे. दुसरीकडे, अमेरिकेतील सामान्य लोकांपेक्षा जॉन्सन अँड जॉन्सनची लस घेणार्‍या लोकांमध्ये ही शक्यता तीन ते पाच पट जास्त आहे. कंपनीची लस घेणाऱ्या लोकांमध्ये गुलियन बेरी सिंड्रोमची 100 संशयित प्रकरणे अधिकाऱ्यांना आढळली आहेत.


एफडीएने दिलेल्या माहितीनुसार, यातील 95 टक्के प्रकरणे गंभीर मानली जात आहेत आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता आहे. अमेरिकेत 12.8 कोटी किंवा जवळपास 8 टक्के लोकांना जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीचा डोस देण्यात आला आहे. तर 14.6 कोटी लोकांना फायझर किंवा मॉडर्ना कंपनीची लस देण्यात आली आहे.

काय आहे, Guillain-Barré syndrome?
एफडीएच्या मते, ज्यावेळी इम्युन सिस्टम नर्व्ह सेल्स खराब होऊन स्नायू कमकुवत होतात आणि कधीकधी अर्धांगवायू सुद्धा होतो तेव्हा Guillain–Barré syndrome होतो. अमेरिकेत जवळपास 10 लाख लोकांना ही समस्या आहे. मात्र, गंभीर लक्षणांचा सामना करणारे बहुतेक लोक या समस्येपासून बरे होतात. दरम्यान, या एप्रिलच्या सुरुवातीला एफडीएने या लसीसंदर्भात कमी प्लेटलेट्ससह रक्त जमा होण्याविषयी इशारा दिला होता. लसीकरणाच्या 10 दिवसांच्या स्थगितीनंतर हा इशारा देण्यात आला आहे.  

Read in English

Web Title: johnson and johnson vaccine increases risk of rare nerve syndrome, fda warns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app