न शिकविता बायडेन यांनी घेतला आठ कोटी पगार; शिक्षणसंस्थेत होते मानद प्राध्यापक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 11:29 AM2023-01-14T11:29:03+5:302023-01-14T11:29:37+5:30

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वी जो बायडेन हे काही काळ पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या अख्यत्यारितील शिक्षणसंस्थेत मानद प्राध्यापक होते.

Joe Biden took eight crore salary without teaching; There were honorary professors in the educational institution | न शिकविता बायडेन यांनी घेतला आठ कोटी पगार; शिक्षणसंस्थेत होते मानद प्राध्यापक

न शिकविता बायडेन यांनी घेतला आठ कोटी पगार; शिक्षणसंस्थेत होते मानद प्राध्यापक

Next

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वी जो बायडेन हे काही काळ पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या अख्यत्यारितील शिक्षणसंस्थेत मानद प्राध्यापक होते. तिथे पगारापोटी त्यांना आठ कोटी रुपये मिळाले. मात्र, त्यांनी विद्यार्थ्यांना संपूर्ण अभ्यासक्रम शिकविलाच नाही, अशी माहिती उजेडात आली आहे. 

जो बायडेन हे याआधी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष होते. त्या पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर पेनसिल्व्हेनिया विद्यापीठामध्ये त्यांची मानद प्राध्यापकपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांनी प्राध्यापक म्हणून नेमके काय काम केले याचा रिपब्लिकन पक्षाच्या एका समितीने शोध घेतला. 

रिपब्लिकनची टीका

समितीने अहवालात म्हटले आहे की, फिलाडेल्फिया स्कूलमध्ये जो बायडेन २०१७ ते २०१९ या कालावधीत मानद प्राध्यापक होते. त्याचे वेतन त्यांनी घेतले. मात्र, विद्यार्थ्यांना संपूर्ण अभ्यासक्रम शिकविला नाही, अशी टीका रिपब्लिकन पक्षाने केली आहे. 

Web Title: Joe Biden took eight crore salary without teaching; There were honorary professors in the educational institution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.