शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
4
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
5
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
6
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
7
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
8
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
9
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
10
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
11
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
12
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
13
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
14
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
15
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
16
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
17
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
18
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
19
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
20
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
Daily Top 2Weekly Top 5

'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 02:50 IST

दरम्यान, पाकिस्तानी माध्यमांनी या संपूर्ण परिस्थितीसाठी भारताला जबाबदार ठरवले आहे. भारताने पाकिस्तानला न कळवताच झेलम नदीचे पाणी सोडले, यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली, असा आरोप दुनिया न्यूजच्या एका वृत्तात करण्यात आला आहे...

पहलगाम दहशतवादी हल्यानंतर भारत पाकिस्तान तणाव चांगलाच शिगेला पोहोचला आहे. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कठोर कारवाई करत सिंधू पाणी करार स्थगित केला. यामुळे, एकीकडे संपूर्ण पाकिस्तानचे लक्ष सिंधू पाणी कराराच्या मुद्द्याकडे लागले असतानाच. दुसरीकडे, झेलम नदीला अचानक पूर आल्याने मुजफ्फराबाद जिल्ह्यात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून लोकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे येथील प्रशासनाने वॉटर इमरजन्सीची घोषणा केली आहे. 

दरम्यान, पाकिस्तानी माध्यमांनी या संपूर्ण परिस्थितीसाठी भारताला जबाबदार ठरवले आहे. भारताने पाकिस्तानला न कळवताच झेलम नदीचे पाणी सोडले, यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली, असा आरोप दुनिया न्यूजच्या एका वृत्तात करण्यात आला आहे.

संबंधित वृत्तांनुसार, स्थानिक प्रशासनाने हट्टियन बालामध्ये आणिबाणी लागू करून लोकांना सतर्क रहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच मशिदींमधूनही घोषणा करून लोकांना सूचना दिली जात आहे. या वृत्तानंतर, नदी काठी राहणाऱ्या लोकांमध्ये दहशत पसरली आहे. या वृत्तानुसार, हे पाणी भारतातील अनंतनाग आणि पाकिस्तानातील चकोठी भागातून वाहत आहे.

सिंधू करार रद्द - तत्पूर्वी, भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान विरोधात कठोर भूमिका घेत अनेक निर्णय घेतले आहेत. यातच भारताने सिंधू पाणी करारही स्थगित केला आहे. यानंतर आता भारत सरकारकडून या पाण्याच्या वापरासंदर्भातही विचार केला जात आहे. सरकार भविष्यात पाण्याचा प्रवाह वळवण्यासह, इतरही संभ्याव्य पर्यायांवर कायदेशीर आणि तांत्रिक दृष्टीने विचार करत आहे. 

सिंधू नदीतील एक थेंब पाणीही पाकिस्तानात जाणार नाही -दरम्यान, 'मोदी सरकारकडून सिंधू पाणी करारासंदर्भात घेण्यात आलेला ऐतिहासिक निर्णय, हा पूर्णपणे न्यायसंगत आणि देशाच्या हिताचा आहे. पाकिस्तानात सिंधू नदीचे एक थेंब पाणीही जाणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ,' असे जल शक्तीमंत्री सीआर पाटिल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एका पोस्टच्या माध्यमाने म्हटले आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानfloodपूरriverनदीMediaमाध्यमे