शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
3
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

जपानी ओलिसाची इसिसकडून हत्या

By admin | Updated: January 26, 2015 03:16 IST

इस्लामिक स्टेट्सच्या ताब्यातील एका जपानी ओलिसाची हत्या केल्याची चित्रफीत प्रसिद्ध करण्यात आली असून, यामुळे जपानी नागरिकांना जबरदस्त धक्का बसला आहे

टोकियो : इस्लामिक स्टेट्सच्या ताब्यातील एका जपानी ओलिसाची हत्या केल्याची चित्रफीत प्रसिद्ध करण्यात आली असून, यामुळे जपानी नागरिकांना जबरदस्त धक्का बसला आहे. दरम्यान, जपानचे पंतप्रधान शिन्जो अ‍ॅबे यांनी या घटनेचा निषेध केला आहे.इस्लामिक स्टेट्सच्या जिहादींच्या ताब्यात दोन जपानी ओलिस होते व त्यांच्या सुटकेसाठी जिहादींनी २०० दशलक्ष डॉलरची मागणी केली होती. त्यानंतर जपानचे सरकार व नागरिक ओलिसांच्या सुटकेसाठी प्रयत्न करीत होते; पण एका ओलिसाची हत्या झाल्याची चित्रफीत पाहिल्यानंतर संपूर्ण राष्ट्र सुन्न झाले असून, दुसरा ओलिस केनजी गोटो (४७, पत्रकार ) याच्या सुटकेकडे लोकांनी डोळे लावले आहेत. जपानचे पंतप्रधान शिन्जो अ‍ॅबे यांनी एनएचके या सरकारी वाहिनीवर येऊन दहशतवाद्यांकडे गोटोला सुरक्षित सोडण्याची मागणी केली. इसिसने प्रसिद्ध केलेली चित्रफीत खरी असावी, असे मानण्यास जागा आहे. सरकार अजूनही या चित्रफितीची पाहणी करीत आहे. या चित्रफितीबरोबर काय संदेश आहे हे सांगण्यास अ‍ॅबे यांनी नकार दिला आहे. गोटोच्या सुरक्षित सुटकेसाठी एक कैदी सोडण्याची मागणी या चित्रफितीत करण्यात आली आहे. मी अवाक् झालो आहे, अशा कृतींचा आम्ही कठोरपणे व पूर्णपणे अशा कृतींचा निषेध करीत आहोत, असे मृत ओलिस युवकाचे पिता शोईची यांनी पत्रकारांना सांगितले. माझ्या मुलाचा मृत्यू झाला नसावा, असे मला आतून वाटत आहे. आपण त्याला कधीच पुन्हा पाहणार नाही, असे वाटले असते तर त्याला आलिंगन देण्याची माझी इच्छा होती, असेही शोईची म्हणाले. जपानचे पंतप्रधान शिन्जो अ‍ॅबे यांनी इराक व सिरियात जपानी सैनिक वाढविण्याची घोषणा केली होती, तसेच इसिसविरोधात चाललेल्या लढ्यासाठी २०० दशलक्ष डॉलरची मदत जाहीर केली होती. त्यांच्या या निर्णयावर जपानमध्ये टीका होत आहे. (वृत्तसंस्था)