‘F-35 पाडण्यापेक्षा सैनिकांना मारणं सोपं, जवळ या, आम्ही वाटच पाहतोय’, इराणचं अमेरिकेला आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 13:31 IST2026-03-25T13:29:39+5:302026-03-25T13:31:14+5:30

Iran War News: एकीकडे युद्धविरामाची घोषणा आणि इराणसोबत सकारात्मक चर्चेचे दावे करत असतावाचा अमेरिकेने आखाती देशांमध्ये सैनिकांची जमवाजमव सुरू केली आहे. एफ ३५ विमानाला पाडण्यापेक्षा सैनिकांना मारणं सोपं आहे, तुम्ही जवळ या आम्ही तुमची वाटच पाहतोय, असा इशारा इराणने अमेरिकेला दिला आहे.

‘It’s easier to kill soldiers than shoot down F-35, come closer, we’re waiting’, Iran challenges America | ‘F-35 पाडण्यापेक्षा सैनिकांना मारणं सोपं, जवळ या, आम्ही वाटच पाहतोय’, इराणचं अमेरिकेला आव्हान

‘F-35 पाडण्यापेक्षा सैनिकांना मारणं सोपं, जवळ या, आम्ही वाटच पाहतोय’, इराणचं अमेरिकेला आव्हान

एकीकडे युद्धविरामाची घोषणा आणि इराणसोबत सकारात्मक चर्चेचे दावे करत असतावाचा अमेरिकेने आखाती देशांमध्ये सैनिकांची जमवाजमव सुरू केली आहे. अमेरिकेकडून पाचारण करण्यात येत असलेले हे सैनिक जगातील सर्वात धोकादायक  सैन्य आहे. तसेच या माध्यमातून अमेरिकाइराणवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र आता इराणने अमेरिकेलाच आव्हान दिले आहे. एफ ३५ विमानाला पाडण्यापेक्षा सैनिकांना मारणं सोपं आहे, तुम्ही जवळ या आम्ही तुमची वाटच पाहतोय, असा इशारा इराणने अमेरिकेला दिला आहे.

अमेरिकेकडून आखाती देशांमध्ये हजारो सैनिकांना तैनात करण्याची तयारी सुरू आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सचे वरिष्ठ अधिकारी अली अकबर अहमदियन यांनी थेट अमेरिकेला आव्हान दिले आहे. आम्ही अनेक वर्षांपासून अमेरिका या भागात कधी घुसते, याची वाट पाहत आहोत, २० वर्षांपासून त्या रणनीतीनुसार प्रशिक्षण घेत आहोत. आता आमच्या जवळ या, हाच आमचा अमेरिकन सैनिकांसाठी संदेश आहे, असा इशारा त्यांनी दिला आहे.

या युद्धजन्य परिस्थितीमध्ये इराणने दिलेली ही प्रतिक्रिया इराणची युद्धनीती, भौगोलिक माहिती, विकेंद्रित मोहिमा आणि लक्षित हल्ल्यांना प्राधान्य देणारी आहे. इराणी तज्ज्ञ फौद इजाही यांनी सांगितले की, अमेरिकन सैनिकांची तैनाती इराणच्या बाजूने रणनीतिक बदल घडवून आणू शकते. इराणी जनरल याचं स्वागतच करतील. कारण हवेतून जाणाऱ्या एफ-३५ विमानाला मारण्यापेक्षा जमिनीवरील सैनिकांना मारणं सोपं आहे. इथे तुम्हा अनेक अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाल्याचे दिसेल.

त्यांनी सांगितले की, जमिनीवर लढलं जाणारं युद्ध हे लांब पल्ल्याच्या हल्ल्यांपेक्षा अधिक जोखमीचं असेल. तसेच आमने सामनेच्या लढाईत टिकाव धरताना अमेरिकन सैन्याची कसोटी लागणार आहे. 

Web Title : ईरान की अमेरिका को चुनौती: एफ-35 गिराने से सैनिकों को मारना आसान

Web Summary : बढ़ते तनाव के बीच, ईरान ने अमेरिका को चुनौती देते हुए कहा कि उसकी सेना अमेरिकी सैनिकों का इंतजार कर रही है। एक ईरानी विशेषज्ञ का दावा है कि जमीनी लड़ाई बेहतर है, जिससे सैनिक एफ-35 जेट की तुलना में आसान लक्ष्य बन जाते हैं। ईरान 20 वर्षों से इस परिदृश्य की तैयारी कर रहा है, जमीनी युद्ध का स्वागत है।

Web Title : Iran Challenges US: Killing Soldiers Easier Than Downing F-35

Web Summary : Amid rising tensions, Iran dares the US, stating its forces await American troops. An Iranian expert claims ground combat is preferred, making soldiers easier targets than F-35 jets. Iran has been preparing for this scenario for 20 years, welcoming a ground war.