इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 17:03 IST2026-04-07T17:02:47+5:302026-04-07T17:03:49+5:30

इस्रायली सैन्याने इराणमध्ये सुरू केलेल्या या विशेष मोहिमेत इराणच्या धार्मिक सत्तेशी संबंधित आणि लष्करातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्यचे समजते...

Israel's major airstrike on Iran! 18 dead, 24 seriously injured; Veteran military officer killed? Weapons depot destroyed in Tehran | इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त

इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त

इस्रायलने मंगळवारी इराणच्या अल्बोर्ज प्रांतात भीषण हवाई हल्ले केलेे. इस्रायलच्या या हल्ल्यात १८ जणांचा मृत्यू झाला असून २४ जण गंभीर जखमी झाले आहेत. यावेळी इस्रायलने काही महत्वाच्या ठिकानांना लक्ष्य केले आहे. 

तेहरानमध्येही हवाई हल्ले -
इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, तेहरानच्या वायव्य भागात असलेल्या अल्बोर्ज प्रांतात इस्रायने क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यात नेमके कुणाला लक्ष्य करण्यात आले, हे अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही. याशिवया, इराणची राजधानी असलेल्या तेहरानमध्येही हवाई हल्ले करण्यात आले. यात डोंगराळ भागातील एक शस्त्रास्त्रे साठवण्याचा डेपो आणि काही निवासी भागांचाही समावेश असल्याचे समजते.

लष्करी अधिकाऱ्यांचा खात्मा? -
इस्रायली सैन्याने इराणमध्ये सुरू केलेल्या या विशेष मोहिमेत इराणच्या धार्मिक सत्तेशी संबंधित आणि लष्करातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्यचे समजते. 

आज इराण-इस्रायल युद्धाचा ३९ वा दिवस आहे. दिवसागणिक दोन्ही देशांमधील हल्ले अधिकच तीव्र होताना दिसत आहेत. एकीकडे इराण इस्रायलसह आखाती देशांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे इस्रायल आणि अमेरिका एकत्रितपणे इराणमधील विविध ठिकाणांवर क्षेपणास्त्रांचा मारा करत आहेत. यामुळे पश्चिम आशियातील तणाव प्रचंड वाढला आहे.

 

Web Title : ईरान पर इस्राइल का हवाई हमला: 18 की मौत, सैन्य अधिकारी निशाना?

Web Summary : ईरान के अल्बोर्ज प्रांत में इस्राइली हवाई हमलों में 18 लोगों की मौत, 24 घायल। तेहरान में भी हमले, हथियार डिपो लक्षित। ईरानी धार्मिक सत्ता से जुड़े वरिष्ठ सैन्य अधिकारियों की मौत की खबर। तनाव बढ़ा।

Web Title : Israel's Airstrike on Iran: Casualties Reported, Military Officials Targeted

Web Summary : Israeli airstrikes in Iran's Alborz province killed 18 and injured 24. Tehran also faced attacks, targeting weapon depots. Senior military officials linked to Iran's religious authority are reportedly dead. Tensions escalate as conflict intensifies.