इस्त्रायलचा दुहेरी दणका! एकाच वेळी दोन देशांवर सुरू केली बॉम्बिंग...! तेहरानमध्ये हाहाकार, IDF नं दिली महत्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 13:57 IST2026-03-03T13:55:44+5:302026-03-03T13:57:25+5:30

इस्त्रायल- अमेरिका आणि इराण युद्ध आता अधिकच तीव्र होताना दिसत आहे. इस्त्रायली संरक्षण दलाने (IDF) दिलेल्या माहितीनुसार, आता तेहरानसह ...

Israel's double blow! Bombing started on two countries iran and Lebanon at the same time...! Chaos in Tehran, IDF gave important information | इस्त्रायलचा दुहेरी दणका! एकाच वेळी दोन देशांवर सुरू केली बॉम्बिंग...! तेहरानमध्ये हाहाकार, IDF नं दिली महत्वाची माहिती

इस्त्रायलचा दुहेरी दणका! एकाच वेळी दोन देशांवर सुरू केली बॉम्बिंग...! तेहरानमध्ये हाहाकार, IDF नं दिली महत्वाची माहिती


इस्त्रायल-अमेरिका आणि इराणयुद्ध आता अधिकच तीव्र होताना दिसत आहे. इस्त्रायली संरक्षण दलाने (IDF) दिलेल्या माहितीनुसार, आता तेहरानसह बेरूत वरही हल्ले सुरू करण्यात आले आहेत. या दोन्ही शहरांवर एकाच वेळी बॉम्बिंग सुरू करण्यात आली आहे. इस्त्रायली हवाई दलाने इराणी राजवट आणि हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेविरुद्ध मोठी आघाडी उघडली आहे.

लष्करी तळांना लक्ष्य
IDF ने आपल्या निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, इराणची राजधानी तेहरान आणि लेबनॉनची राजधानी बेरूत येथील लष्करी तळांवर 'टारगेटेड' हल्ले सुरू केले आहेत. IDF चे अरबी भाषेचे प्रवक्ते अविचाय अद्राई यांनी दिलेल्या माहितीनुसार, अत्यंत जबरदस्त हल्ले सुरू आहेत. महत्वाचे म्हणजे, कारवाई सुरू करण्याआधी, बेरूतच्या दक्षिण भागातील अनेक गावांतील नागरिकांना तातडीने घरे रिकामी करण्याची सूचना देण्यात आली. त्यानंतर साधारणपणे तासाभरानंतर कारवाई सुरू करण्यात आली. हिजबुल्लाहचे कमांड सेंटर आणि शस्त्रसाठा नष्ट करणे, हा या हल्ल्यांमागचा मुख्य उद्दिष्ट आहे.

IRGC चे पाच सदस्य ठार -
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसर, अमेरिका आणि इस्त्रायलच्या संयुक्त हवाई हल्ल्यात इराणच्या 'इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स' (IRGC) चे पाच सदस्य ठार झाल्याचे समजते.

अमेरिकेची महत्त्वाची पावले
सातत्याने वाढत चाललेला संघर्ष आणि बिघडलेली सुरक्षा व्यवस्था पाहता, अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटने बहरीन, इराक आणि जॉर्डन येथील आपल्या दूतावासांमधून अत्यावश्यक नसलेले सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना मायदेशी परतण्याचे आदेश दिले आहेत. हे युद्ध आणखी चिघळण्याची शक्यता असल्याने, सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे.
 

Web Title : इजराइल का हमला तेज: तेहरान, बेरूत में बमबारी; IRGC सदस्य मारे गए।

Web Summary : इजराइल ने तेहरान और बेरूत पर एक साथ हमले किए, जिसमें ईरान और हिजबुल्लाह से जुड़े सैन्य ठिकानों को निशाना बनाया गया। आईडीएफ ने बेरूत निवासियों को चेतावनी के बाद इसे लक्षित हमला बताया। रिपोर्टों से संकेत मिलता है कि संयुक्त अमेरिकी-इजरायली हमलों में IRGC सदस्य मारे गए। अमेरिका दूतावास के कर्मचारियों को निकाल रहा है।

Web Title : Israel Intensifies Attacks: Bombing Tehran, Beirut; IRGC Members Killed.

Web Summary : Israel has launched simultaneous attacks on Tehran and Beirut, targeting military sites linked to Iran and Hezbollah. The IDF reports these as targeted strikes following warnings to Beirut residents. Reports indicate IRGC members were killed in joint US-Israeli strikes. The US is evacuating embassy staff.