'इस्रायल तेच करेल, जे मी त्यांना सांगेन', असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प हे इराण युद्धात आपणच सर्वात शक्तिशाली आणि सगळी सूत्रे माझ्या हातात असल्याचे दावे करत आहेत. त्यात आता एका नव्या विधानाची भर पडली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्रमक भूमिका घेत पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धावर भाष्य केले आहे."इस्रायल इराणवर करत असलेले हल्ले तेव्हाच थांबतील, जेव्हा मी स्वतः त्यांना तसे सांगेन", असा दावा ट्रम्प यांनी केला आहे.
"मी हल्ले थांबवा म्हणालो की, ते थांबतील"
टाइम मासिकाशी बोलताना ट्रम्प म्हणाले, "ते (इस्रायल) एक चांगले संघ खेळाडू आहेत. मी त्यांना थांबा म्हणालो की, ते थांबतील.
ट्रम्प यांचा इस्रायलवर प्रभाव: ट्रम्प यांच्या मते, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध आहेत. त्यामुळे ट्रम्प यांनी आदेश दिला किंवा इच्छा व्यक्त केली, तर इस्रायल इराणसोबतचा संघर्ष थांबवू शकतो. त्यांना जोपर्यंत डिवचले जाईल, तोपर्यंत त्यांच्याकडे हल्ले करण्याशिवाय पर्याय नाही. पण, मी जेव्हा त्यांना हल्ले थांबवा असे सांगेन, तेव्हा ते थांबवतील", असा दावा करत ट्रम्प यांनी इस्रायलही आपल्या आदेशावर काम करत असल्याचे विधान केले.
आधी केले होते वेगळेच विधान
डोनाल्ड ट्रम्प यांचे नवे विधान त्यांच्या जुन्या विधानाला पूर्णपणे विसंगत आहे. टाइम्स ऑफ इस्रायल या माध्यम संस्थेशी बोलताना त्यांनी वेगळी भूमिका मांडली होती. युद्ध थांबवण्याचा निर्णय हा नेतान्याहू यांच्या सहमतीनेच घेतला जाईल असे म्हटले होते. पण, त्यानंतर त्यांनी आता मी सांगेन तेव्हा ते हल्ले थांबवतील अशी भूमिका मांडली.
ट्रम्प यांनी दररोज बोलणं बंद करावे, फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचा संताप
डोनाल्ड ट्रम्प पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाबद्दल दररोज वेगवेगळ्या भूमिका मांडत आहेत. ट्रम्प यांच्या दररोजच्या विसंगत विधानांवर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन यांनी टीका केली.
स्वतःच मांडलेल्या भूमिकांवरून दररोज यूटर्न घेता येऊ शकत नाही. इराण युद्ध थांबवायचे असेल, तर शस्त्रसंधी करून चर्चा सुरू करावी लागेल. डोनाल्ड ट्रम्प हे दररोज विधाने करत आहेत. आणि दररोज ते अगोदरच्या दिवशी स्वतःच केलेले विधान दुसऱ्या दिवशी खोडून काढत आहेत. त्यांनी दररोज बोलणं बंद करावं, अशा शब्दात मॅक्रॉन यांनी ट्रम्प यांना सुनावले आहे.
Web Summary : Donald Trump claims Israel will halt Iran attacks only when he commands. He asserts strong influence over Netanyahu, contradicting previous statements about joint decision-making. Macron criticizes Trump's inconsistent stance and calls for ceasefire talks.
Web Summary : डोनाल्ड ट्रम्प का दावा है कि इस्राइल ईरान पर हमले तभी रोकेगा जब वह कहेंगे। उन्होंने नेतन्याहू पर मजबूत प्रभाव का दावा किया, पहले के संयुक्त निर्णय वाले बयानों का खंडन किया। मैक्रॉन ने ट्रम्प के असंगत रुख की आलोचना की और युद्धविराम वार्ता का आह्वान किया।