शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
3
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
4
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
5
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
6
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
7
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
8
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
9
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
10
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
11
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
12
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
13
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
14
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
15
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
16
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
17
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
18
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
19
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
20
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील

'लादेन'ची अट मानणं इस्रायलला भाग पडलं; हमासपासून ओलिसांच्या सुटकेसाठी नेतन्याहू काय करणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 3:13 PM

इस्रायलवरील या सर्वात मोठ्या हल्ल्याचे प्लॅनिंग याह्या सिनवारनेच केले होते. या हल्ल्यामुळे तो इस्रायलसाठी अमेरिकेवर हल्ला करणाऱ्या ओसामा बिन लादेन प्रमाणे बनला आहे.

इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू होऊन जवळपास दीड महिना झाला आहे. या युद्धात इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यांत हमाचे 10 हजारहून अधिक लोक मारले गेले आहेत. यानंतर आता, हमास आणि इस्रायल यांच्यात तडजोड होताना दिसत आहे. बुधवारी सकाळी इस्रायलच्या मंत्रिमंडळाने हमाससोबतच्या तडजोडीला मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे, आपल्या ओलिसांना सोडवण्यासाठी इस्रायलने अनेक अटी मान्य केल्या आहेत. 

विशेष म्हणजे, हमास नेता याह्या सिनवारकडून ठेवण्यात आलेली अटही इस्रायलने मान्य केली आहे. यात, युद्धविरामाच्या दिवशी सहा तासांसाठी गाझाच्या हवाई हद्दीत इस्रायली ड्रोन उडणार नाहीत, अशी अटही आहे. इस्रायलला ओलिसांच्या लोकेशनचा ठाव ठिकाणा लागू नये, यासाठी ही अट घालण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे, इस्रायलवरील या सर्वात मोठ्या हल्ल्याचे प्लॅनिंग याह्या सिनवारनेच केले होते. या हल्ल्यामुळे तो इस्रायलसाठी अमेरिकेवर हल्ला करणाऱ्या ओसामा बिन लादेन प्रमाणे बनला आहे.

या अटींसंदर्भात, IDF आणि शिन बेट यांनी दिलेल्या निवेदनाचा हवाला देताना, एक इस्रायली अधिकारी म्हणाले, युद्धविरामाच्या काळातही इस्रायलला गुप्त माहिती मिळविण्याचा अधिकार असेल. युद्धविरामाच्या काळात आमचे डेळे बंद होणार नाहीत. जमिनीवर नेमके काय सुरू आहे, याची माहिती आम्हाला मिळत राहील.' तडजोडीनुसार, इस्रायलच्या 50 ओलिसांना मुक्त करण्यात येईल. या बदल्यात, चार दिवसांचा युद्धविराम असेल. जर हमासने रोज 10 आणखी लोकांना सोडले, तर युद्धविराम एक एक दिवस वाढविला जाईल.

चार दिवसांचा युद्धविराम -इस्रायलकडून गेल्या दीड महिन्यापासून गाझावर सुरू असलेल्या हल्ल्यानंतर हा पहिला युद्धविराम असणार आहे. या युद्धविराममुळे गाझापर्यंत जीवनावश्यक मदतही पोहोचू शकणार आहे. मात्र, युद्धविराम केव्हापासून लागू होणार हे अद्याप स्पष्ट नाही. इस्रायली ओलिसांची गुरुवारपासून सुटका होण्याची शक्यता आहे. दरम्यान, 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला केल्यानंतर हमासने जवळपास 240 इस्रायली नागरिकांना बंदी बनवले होते. यातील बहुतेक लोक तेथे आयोजित करण्यात आलेल्या संगीत महोत्सवात सहभागी झाले होते. याच संगीत महोत्सवाला हमासच्या दहशतवाद्यांकडून लक्ष्य बनवण्यात आले होते.

त्यावेळी, ओलीस असलेल्या इस्रायली नागरिकांव्यतिरिक्त अर्ध्यावर ओलीस अमेरिका, थायलंड, ब्रिटन, फ्रान्स, अर्जेंटिना, जर्मनी, चिली, स्पेन आणि पोर्तुगालसह सुमारे 40 देशांचे नागरिकत्व असलेले आहेत, असे इस्रायली सरकारने म्हटले होते.

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षBenjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहूTerrorismदहशतवाद