Israel US Iran War : इराणचा सौदी अरेबियावर मोठा हल्ला, जगातील सर्वात मोठी तेल रिफायनरी 'अरामको'ला बनवलं निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 14:05 IST2026-03-02T14:02:36+5:302026-03-02T14:05:04+5:30

दरम्यान, या भीषण संघर्षात इराणने आता सौदी अरेबियातील जगातील सर्वात मोठी तेल रिफायनरी 'अरामको'वरही हल्ला केलयाचे आहे.

Israel US Iran War Iran's major attack on Saudi Arabia, targeting the world's largest oil refinery Aramco | Israel US Iran War : इराणचा सौदी अरेबियावर मोठा हल्ला, जगातील सर्वात मोठी तेल रिफायनरी 'अरामको'ला बनवलं निशाणा

Israel US Iran War : इराणचा सौदी अरेबियावर मोठा हल्ला, जगातील सर्वात मोठी तेल रिफायनरी 'अरामको'ला बनवलं निशाणा

अमेरिका आणि इस्रायलनेइराणवर केलेल्या हल्ल्यात, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई ठार झाल्यानंतर, इराण प्रचंड चवताळला आहे. त्याने आपल्या हल्ल्यांची तीव्रता आणखीनच वाढवल्याचे दिसत आहे. इराणच्या हल्ल्याने संपूर्ण मध्यपूर्वेत युद्धाचा भडका उडाला आहे. इराणने गेल्या २४ तासांत १५ हून अधिक देशांमधील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. आता हे युद्ध थांबावे, अशी अमेरिका आणि इस्रायलची इच्छा आहे. मात्र, इराणचा बदला अद्याप बाकी आहे. यासंदर्भात आपण अमेरिकेशी कसल्याही प्रकारची चर्चा करणार नाही, असे इराणने स्पष्ट केले आहे. दरम्यान, या भीषण संघर्षात इराणने आता सौदी अरेबियातील जगातील सर्वात मोठी तेल रिफायनरी 'अरामको'वरही हल्ला केलयाचे आहे.

"शस्त्रे टाका अन्यथा..." -
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणी लष्करी अधिकार्‍यांना शस्त्रे खाली ठेवण्याचे आवाहन केले आहे. जोपर्यंत सर्व उद्दिष्टे साध्य होत नाहीत, तोपर्यंत इराणविरुद्धची लष्करी मोहीम थांबणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. ट्रम्प यांनी व्हिडिओ संबोधनात म्हटले आहे की, "इराणी सैनिकांनी शस्त्रे टाकावीत, अन्यथा त्यांना निश्चितपणे मृत्यूला सामोरे जावे लागेल. हे परिणाम अत्यंत भयावह असतील." यावेली त्यांनी, शरण येणाऱ्यांना सुरक्षिततेची हमी देण्याचे आश्वासनही दिले.

अहमदीनेजाद जिवंत असल्याचा दावा -
चीनच्या 'ग्लोबल टाइम्स'ने दावा केला आहे की, इराणचे माजी राष्ट्राध्यक्ष अहमदीनेजाद इस्रायल-अमेरिका हल्ल्यात मारले गेलेले नाहीत. ते पूर्णपणे सुरक्षित आहेत. तुर्कीच्या 'अनादोलू' एजन्सीच्या हवाल्याने त्यांच्या एका निकटवर्तीयाने सांगितले की, "मी त्यांच्या संपर्कात आहे आणि सर्व काही ठीक आहे."

Web Title: Israel US Iran War Iran's major attack on Saudi Arabia, targeting the world's largest oil refinery Aramco