इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 20:07 IST2025-06-18T20:00:58+5:302025-06-18T20:07:29+5:30

इराणची राजधानी तेहरानमध्ये मोठे स्फोट आणि आगीचे प्रचंड लोट दिसले. मिळालेल्या माहितीनुसार, हा हल्ला विशेषतः तेहरानच्या लवीजान परिसरात करण्यात आला.

Israel targets 'Supreme Leader'! Bomb hits Khamenei's bunker area | इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा

इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा

इराणची राजधानी तेहरानमध्ये काल रात्री मोठे स्फोट आणि आगीचे प्रचंड लोट दिसले. मिळालेल्या माहितीनुसार, हा हल्ला विशेषतः तेहरानच्या लवीजान (Lavizan) परिसरात करण्यात आला. याच ठिकाणी इराणचे क्षेपणास्त्र आणि लष्करी कार्यक्रमांशी संबंधित मोठ्या फॅक्टरी आणि बंकर आहेत. याच परिसरात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा सुरक्षा बंकर असल्याचेही म्हटले जात आहे.

इस्रायलने खामेनेईंना लक्ष्य केले का?
या घटनेमुळे असा प्रश्न उपस्थित होत आहे की, इस्रायलने खामेनेईंनाच लक्ष्य केले आहे का? या स्फोटांच्या काही वेळापूर्वीच इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांनी जनतेला संबोधित करताना इस्रायल आणि अमेरिकेला इशारा दिला होता.

इराणी आंतरराष्ट्रीय माध्यमांनुसार, स्थानिक लोकांनी सांगितले की, या भागात मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आले. स्फोटानंतर आकाशात धुराचे मोठे लोट उठत असल्याचे व्हिडीओ देखील समोर आले आहेत. हा हल्ला इतका तीव्र होता की, आजूबाजूच्या परिसरातील घरांच्या खिडक्याही हादरल्या, असे सांगितले जात आहे.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी यापूर्वी एका मुलाखतीत म्हटले होते की, खामेनेईंच्या मृत्यूनंतरच हे युद्ध थांबेल. याच पार्श्वभूमीवर, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई देशाच्या नावाने आपला संदेश देत असतानाच, इस्रायली लढाऊ विमानांनी तेहरानसह अनेक ठिकाणांवर बॉम्बफेक केली, असे सांगितले जात आहे. मात्र, खामेनींचे हे भाषण थेट (लाइव्ह) नव्हते, तर काही तासांपूर्वीच रेकॉर्ड करण्यात आले होते. या इस्रायली हल्ल्यात इराणी नेत्याच्या संभाव्य ठिकाणालाही लक्ष्य करण्यात आले. खोजिर आणि पारचीन यांसारख्या संवेदनशील भागांवरही हल्ले झाले. त्यामुळे येत्या काही तासांत हा संघर्ष अधिक गंभीर रूप घेऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.

स्फोटांनी तेहरान हादरले!

इराणची राजधानी तेहरानच्या अनेक भागांत जोरदार स्फोटांच्या बातम्या समोर आल्या आहेत. 'इराण इंटरनॅशनल'नुसार, तेथील नागरिकांनी पाठवलेल्या व्हिडीओंमध्ये पूर्व आणि पश्चिम तेहरानमध्ये मोठे स्फोट होताना दिसत आहेत. व्हिडीओंमध्ये राजधानीच्या पूर्वेकडील डोंगरी भागातील नोबोनयाद क्षेत्राजवळ मोठा स्फोट होताना दिसत आहे. तर, इतर व्हिडीओंमध्ये पूर्वेकडील पर्दीस फेज-८, पश्चिमेकडील चितगढजवळ असलेल्या शहरक-ए-एस्तेगलाल आणि शाहरान या भागांत पुन्हा इस्रायली हल्ल्यांचे संकेत मिळाले आहेत. यापूर्वीही शाहरानमधील एका इंधन डेपोला लक्ष्य करण्यात आले होते. याव्यतिरिक्त, उत्तर तेहरानमधील सिओल स्ट्रीटजवळ आणखी एका स्फोटाची बातमी आहे. या हल्ल्यांबाबत इराण सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.

Web Title: Israel targets 'Supreme Leader'! Bomb hits Khamenei's bunker area