एका भाजी विक्रेत्याच्या भांडणाने पेटले इस्रायल-सीरिया युद्ध; आतापर्यंत ३०० लोकांचा मृत्यू...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 12:01 IST2025-07-17T12:00:35+5:302025-07-17T12:01:13+5:30
Israel-Syri: इस्रायल-तुर्की युद्ध थांबले, तेच आता इस्रायलने सीरियाशी युद्ध सुरू केले आहे.

एका भाजी विक्रेत्याच्या भांडणाने पेटले इस्रायल-सीरिया युद्ध; आतापर्यंत ३०० लोकांचा मृत्यू...
Israel-Syria:इस्रायल आणि तुर्कीमध्ये सुरू असलेले युद्ध थांबले, पण आता इस्रायलनेसीरियाशीयुद्ध सुरू केले आहे. विशेष म्हणजे, या युद्धाची कारण अतिशय शुल्लक आहे. एका भाजी विक्रेत्यासोबत झालेल्या चोरीच्या घटनेमुळे दोन देश आमने-सामने आळे आहेत. यामुळे सीरियाच्या दक्षिण भागातील सुमारे ३०० लोकांना आपले प्राण गमवावे लागले. अजूनही अनेक लोक जीवन आणि मृत्यूशी झुंजत आहेत.
घटनेची सुरुवात कशी झाली?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका आठवड्यापूर्वी सुवैदा शहरात कारने जाणाऱ्या भाजी विक्रेत्या फदल्लाह द्वाराला चोरांनी रोखले आणि त्याच्याकडून ४०० पौंड (सुमारे ४५ हजार रुपये) हिसकावून घेतले. यादरम्यान, त्याला मारहाणही करण्यात आली. या घटनेची बातमी मीडियात येताच सीरियाच्या सुवैदामध्ये गोंधळ उडाला. या घटनेनंतर ड्रुझ आणि बेदुइन समुदाय समोरासमोर आले. दोघांनीही एकमेकांच्या लोकांना मारण्यास सुरुवात केली.
भाजी विक्रेत्यातील भांडणाची ही घटना प्रथम दोन समुदायांमधील आणि नंतर दोन देशांमध्ये युद्धाचे कारण बनली. या शुल्लक घटनेने दोन्ही देशांना युद्धाच्या उंबरठ्यावर आणले आहे. शांतता प्रस्थापित झाली नाही, तर युद्धात दोन्ही देशांतील हजारो लोक मारले जाऊ शकतात.
इस्रायलने युद्ध का छेडले?
सुवैदा शहर इस्रायलच्या जवळ आहे. येथे मोठा संघर्ष पेटला, तेव्हा सीरियन सरकारने सैन्य तैनात केले. सीरियन सरकारने म्हटले की, सैन्य तैनात केल्याशिवाय परिस्थिती नियंत्रित करता येणार नाही, परंतु इस्रायलने अर्थाने घेतले आणि सुवैदा येथील सैन्यावर हल्ला केला. सीरियन सैन्य आणि इस्रायलमधील लढाई वाढली, तेव्हा इस्रायली सैन्याने सीरियन राजधानी दमास्कसवर हल्ला केला.